Australia vs South Africa in WTC Final 2025: दक्षिण आफ्रिकेने अनपेक्षित खेळ करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ च्या जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली आहे. एडन मार्करम व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी शतकी भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला हार मानण्यास भाग पाडले आहे. गतविजेत्या ऑसींची देहबोली पाहून त्यांनीही हार पत्करली असल्याचे दिसतेय. टेम्बाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले तरीही तो देशाला २७ वर्षानंतर आयसीसी स्पर्धा जिंकून देण्यासाठी मैदानावर उभा राहिला. मार्करमने शतकी खेळी केली.