WTC Final 2025: स्टीव्ह स्मिथची एक चूक ऑस्ट्रेलियाला महागात पडली; द. आफ्रिकेने तिथूनच मुसंडी मारली, Viral Video

Steve Smith's dropped catch changed the WTC 2025 final: दक्षिण आफ्रिका २७ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. १९९८ मध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर बऱ्याचदा आयसीसी ट्रॉफीच्या जवळ पोहोचूनही त्यांना अपयश आले होते. मात्र, यावेळी टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेने चोकर्स हा टॅग हटवण्याचा निर्धार केला आणि त्यादिशेने वाटचाल केली आहे.
Steve Smith's Costly Drop of Temba Bavuma
Steve Smith's Costly Drop of Temba Bavuma esakal
Updated on

In a game-changing moment during the WTC Final 2025 : आयसीसी स्पर्धेतील दादा संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागणार, असेच चित्र आहेत. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावर लागलेला चोकर्स हा ठपका पुसून टाकला आणि टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली WTC Final जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलियाला जेतेपदाची ट्रॉफी राखता आली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com