

Team India | Sri Lanka vs India 2nd Test | WTC 2025-27 Points Table
Sakal
WTC 2025-27 Points Table: कोलंबोमध्ये झालेला श्रीलंका विरुद्ध भारत (Sri Lanka vs India) यांच्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने १-० अशी जिंकली. मात्र दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने (Team India) फॉलोऑन दिल्यानंतरही श्रीलंकेने पराभव टाळण्यात यश मिळवले आहे.
श्रीलंकेच्या तळातील फलंदाजांनी दुसऱ्या डावात जवळपास ९० षटके फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाच्या हातून विजय निसटला. त्याचा फटका आता भारतीय संघाला बसला आहे. कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ (WTC 2025-27) स्पर्धेचा भाग आहे. त्यामुळे या कोलंबो कसोटीच्या अनिर्णित निकालाचा परिणाम WTC च्या पाँइंट्स टेबलवरही झाला आहे.