

Yashasvi Jaiswal and Asitha Fernando Exchange Words
Sakal
Sri Lanka vs India, 2nd Test Marathi News: भारत आणि श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना कोलंबोमधील सिंहाली स्पोर्ट्स क्लब इथे रविवारी (२३ ऑगस्ट) सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण पहिल्याच सत्रात मैदानात वाद झाल्याचे दिसले.
भारताने पहिल्या सत्रात दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यावेळी यशस्वी जैस्वालच्या (Yashasvi Jaiswal) विकेटनंतर त्याच्यात आणि श्रीलंकन गोलंदाजामध्ये शाब्दिक चकमक झाली.