Viral Video: 'तू तिथं गेलाच का, आता...' ऑस्ट्रेलियामध्ये नो एन्ट्री झोनमध्ये अडकलेल्या जैस्वालची रोहित-गिलने घेतली फिरकी

Rohit Sharma and Shubman Gill Teased Yashasvi Jaiswal : सराव सामन्यानंतर भारतीय संघ ऍडलेडला गेला. कॅनबरावरून ऍडलेडला जातानाच्या प्रवासाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जैस्वालची रोहित शर्मा आणि शुभमन गिल मस्करी करताना दिसत आहेत.
Yashasvi Jaiswal Rohit Sharma Shubman Gill Banter
Yashasvi Jaiswal Rohit Sharma Shubman Gill BanterSakal
Updated on

Team India Video: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेडला होणार आहे. हा सामना दिवस-रात्र असल्याने गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. याचमुळे भारताचा कॅनबरामध्ये सराव सामना झाला.

या सराव सामन्यानंतर सोमवारी भारतीय संघ ऍडलेडला गेला. दरम्यान, कॅनबरावरून ऍडलेडला जातानाच्या प्रवासाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Yashasvi Jaiswal Rohit Sharma Shubman Gill Banter
IND vs AUS: रोहित शर्मा सलामीला खेळणार नाही? सराव सामन्यानंतर चर्चेला उधाण; पण गिलच्या अर्धशतकाने टीम इंडियाला दिलासा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com