
भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. ४ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चहल आरजे महावश हिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बऱ्याच चर्चा झाल्या.