न्यूझीलंडने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत ३ बाद ६०१ धावा करत ४७६ धावांची आघाडी घेतली.
डेव्हॉन कॉनवे (१५३), हेन्री निकोल्स (१५०*) आणि रचिन रवींद्र (१६५*) यांनी प्रत्येकी १५०+ धावा केल्या.
एका डावात तीन फलंदाजांनी १५०+ धावा करण्याची न्यूझीलंडची कसोटीतील पहिलीच वेळ ठरली.
Historic batting records in Test cricket by New Zealand : न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस गाजवला. यजमान झिम्बाब्वेचा पहिला डाव १२५ धावांवर गुंडाळल्यानंतर किवींनी प्रत्युत्तरात ३ बाद ६०१ धावा करताना ४७६ धावांची आघाडी घेतली. डेव्हॉन कॉनवे, रचीन रविंद्र व हेन्री निकोल्स या तिघांनी १५० हून अधिक धावांची वैयक्तिक खेळी करताना इतिहासात त्यांची नावं सुवर्णाक्षरांनी लिहिली.