Tanaka Chivanga takes 3 wickets as South Africa collapses to 23/3
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ विजेत्या दक्षिण आफ्रिका संघाला दुबळ्या झिम्बाब्वेने धक्के दिले. झिम्बाब्वे-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मालिकेसाठी आफ्रिकेने बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी दिली. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार डेवॉल्ड ब्रेव्हिस याचे कसोटीत पदार्पण झाले. त्याचवेळी क्वेना मफाका व लॉअन- ड्रे प्रेटोरियस हे युवा खेळाडू आज प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत. १८९६ नतंर प्रथमच आफ्रिकेच्या संघात दोन किशोरवयीन खेळाडू खेळत आहेत.