
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीच्या अडचणी वाढल्या आहेत. दुखापतीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलं होतं. आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आयपीएल फ्रँचाईजी सनरायजर्स हैदराबादचा क्रिकेटपटू असणाऱ्या नीतीश रेड्डीच्या माजी एजंटनेच त्याच्याविरोधात एक याचिका दाखल केलीय. नीतीश रेड्डीकडे ५ कोटींच्या थकीत रकमेची मागणी करण्यात आलीय.