Video : तुमच्यासाठी कायपण; सचिनने दिलेलं चॅलेंज कांबळीनं केलं पूर्ण!

टीम ई-सकाळ
Tuesday, 4 February 2020

हेच गाणे गाण्याचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिले होते. ते चॅलेंज आज पूर्ण करत 'तुमच्यासाठी कायपण' हे कांबळीने आज सिद्ध केलं.

मुंबई : 'गॉड ऑफ क्रिकेट' अशी ओळख असलेला सचिन तेंडुलकर आणि त्याचा लंगोटी यार विनोद कांबळी यांची मैत्री जगविख्यात आहे. त्यांच्या फ्रेंडशिपच्या रियुनीयननंतर दोघांनी क्रिकेटची पुढची पिढी घडविण्यासाठी पावले उचलली आहेत. आणि त्या कामाला त्यांनी सुरवातही केली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विनोद कांबळीला चॅलेंज करत ते पूर्ण करण्यासाठी आठवड्याचा वेळही दिला होता. जर हे चॅलेंज आठवड्याच्या आत पूर्ण केले तर वाट्टेल ते द्यायला सचिनने तयारी दर्शविली होती. 

- INDvsNZ : 'डान्स लाईक चहल'; टीम इंडियातील खेळाडूंचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल!

सचिनने दिलेलं चॅलेंज आज कांबळीने पूर्ण केले. त्यामुळे आपल्या मित्राने दिलेलं चॅलेंज कांबळीने पूर्ण केले असून आता सचिनही दिलेला शब्द पाळतो का? याकडे चाहत्यांचं लक्ष्य लागलं आहे.  

- INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!

दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि बॉलिवूड सिंगर सोनू निगम यांनी मिळून सचिनच्या कारकीर्दीवर एक गाणं तयार केलं होतं. यामध्ये त्याच्यासोबत क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. सचिनने टोलवलेले षट्कार-चौकार आणि स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सगळे क्रिकेट फॅन्सही दाखवण्यात आले होते. 

- भज्जी आता क्रिकेटच्या मैदानातून थेट बाॅलिवूडच्या सेटवर

या क्रिकेट साँगला सोनू निगमसोबत सचिननेही आवाज दिला आहे. याद्वारे सचिनने क्रिकेटनंतर आता गायन क्षेत्रामध्ये पदार्पण केले. क्रिकेटवाली बीट पे असे या गाण्याचे बोल असून हे गाणे आतापर्यंत 58 लाख नेटकऱ्यांनी पाहिले आहे. 

हेच गाणे गाण्याचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिले होते. ते चॅलेंज आज पूर्ण करत 'तुमच्यासाठी कायपण' हे कांबळीने आज सिद्ध केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketer Vinod Kambli completed Sachin Tendulkars challenge