esakal | INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!
sakal

बोलून बातमी शोधा

Broad-Dube

टीम इंडियाचा सुपरडुपर हिट बॅट्समन युवराज सिंगने 2007 च्या वर्ल्डकप सामन्यावेळी ब्रॉडला सलग 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम केला होता.

INDvsNZ : दुबेने करून दिली ब्रॉडची आठवण; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

INDvsNZ : माऊंट मौगानुई : चारही बाजूंनी गवताच्या टेकड्यांनी वेढलेल्या येथील मैदानावर भारत-न्यूझीलंडमध्ये झालेला पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना भारताने जिंकला. आणि पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत धुरळा उडवला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबरोबरच टीम इंडियाने किवीजच्या भूमीवर मालिका विजयही साजरा केला. न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने पहिल्यांदाच केला आहे. मात्र, या विजयानंतर क्रिकेट फॅन्सनी ऑलराउंडर शिवम दुबेला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. 

- सेहवागचे धोनीवर गंभीर आरोप, म्हणाला...

पहिल्या ओव्हरपासून भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे किवीजने 17 रन्समध्येच आघाडीचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण, टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी 99 धावांची पार्टनरशिप केली. भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना त्यांनी सामन्याचा रोखच बदलून टाकला होता. न्यूझीलंड हा सामना आरामात खिशात घालतेय अशी स्थिती निर्माण झाली होती. 

-#AusOpen : मुगुरुझाला हरवत 21 वर्षीय केनिन बनली नवी टेनिस क्वीन!

दरम्यान, शिवम दुबेनं टाकलेल्या ओव्हरमुळे सर्वच क्रिकेट फॅन्सना इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची आठवण झाली. सेफर्ट आणि टेलर यांनी दुबेच्या गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या. पहिला बॉल सिक्स, दुसरा पण सिक्स, तिसऱ्या बॉलवर फोर, चौथ्या बॉलवर एक रन, पाचवा नो बॉल अन् फोर, पाचवा बॉल सिक्स अन् शेवटचा सहाव्या बॉलवर पण सिक्स.

एक सोडता ओव्हरमधील प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेर. दुबेने टाकलेली ओव्हर टीम इंडियासाठी काळजी वाढवणारी ठरली. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स देणाऱ्या बॉलरच्या यादीत दुबेनं कुप्रसिद्ध दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. या यादीत इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या स्थानी कायम आहे. टीम इंडियाचा सुपरडुपर हिट बॅट्समन युवराज सिंगने 2007 च्या वर्ल्डकप सामन्यावेळी ब्रॉडला सलग 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम केला होता. 

- U19WorldCup: पुन्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने ​

या टी-20 मालिका विजयानंतर टीम इंडिया वन-डे मालिकेच्या तयारीला लागणार आहे. आता भारत-न्यूझीलंड दरम्यान 3 वन-डे आणि 2 कसोटी मॅच खेळल्या जाणार आहेत.