Virat Kohli Birthday: अनुष्काने पोस्ट केल्या विराटच्या कधी न पाहिलेल्या अतरंगी फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli Birthday

Virat Kohli Birthday: अनुष्काने पोस्ट केल्या विराटच्या कधी न पाहिलेल्या अतरंगी फोटो

आज क्रिकेटर विराट कोहली याचा ३४ वा वाढदिवस आहे. एक उत्तम क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे. क्रिकेट करिअर मधील अप्सडाऊनमुळे मागील काही दिवसांपासून तो चर्चेत होता. मात्र विराटने केलेले विक्रम आजही अविस्मरणीय आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळली. यामध्ये त्याने 40 सामने जिंकून दिले.

आज विराटचा वाढदिवस असल्याने त्याच्या आप्तस्वकीयांकडून तसेच चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशात विराटची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्माने सुद्धा विराटला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: T20 World Cup : हॅट्ट्रिकचा 'षटकार'

अनुष्काने इंस्टाग्रामवर विराटच्या अतरंगी फोटो शेअर करत त्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने शेअर केलेल्या फोटो सध्या सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होत आहे. कारण विराटच्या या अतरंगी फोटो याआधी कुणीच बघितल्या नसाव्यात. या फोटोंवर नेटकरी अनेक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: Virat Kohali: विराटची बॅट पुन्हा तळपली, अणखी एक रेकॉर्ड नजरेत!

मागील काही काळात विराट फार काही चांगला खेळू शकला नव्हता त्यामुळे त्याच्यावर टिकेचा भडीमार सुरू होता. यानंतर त्याला कर्णधारपदापासूनही मुकावे लागले होते. हा विराटच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ म्हणावा लागेल. मात्र तो डगमगला नाही आणि पुन्हा फुल फॉर्मवर आला.

आता आशिया चषकापासून कोहलीचा परफॉर्म चांगला आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये कोहलीने चांगली कामगिरी केली होती. तसेच सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत विराटने चांगली खेळी केली . त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने 220 धावा काढल्यात.