esakal | 'यशस्वी' हिरा कसा व कुठे सापडला, त्याची कथा...!
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketer Yashasvi jaiswal success story in marathi

परवा 19 वर्षाखालील विश्‍वचषकाच्या उपांत्य सामन्यात देशासाठी विजयी षटकाराने शतक ठोकणारा हाच यशस्वी जयस्वाल. आता रविवारच्या अंतिम सामन्यावेळी यशस्वीकडेच अख्ख्या देशाच्या नजरा लागलेल्या असतील. 

'यशस्वी' हिरा कसा व कुठे सापडला, त्याची कथा...!

sakal_logo
By
नितीन मुजुमदार

ही कथा चित्रपटात शोभावी अशी आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातील भदोईच्या भूपेंद्र व कंचन जयस्वाल यांचा अकरा-बारा वर्षांचा मुलगा मुंबईत येतो काय, काही काळ ओव्हल मैदानावरील तंबूत वास्तव्य काय करतो काय, पडेल ते काम करीत असताना अगदी पाणीपुरी विकतो काय, अन्‌ उदयोन्मुख क्रिकेटपटू म्हणून नाव कमावतो काय. परवा 19 वर्षाखालील विश्‍वचषकाच्या उपांत्य सामन्यात देशासाठी विजयी षटकाराने शतक ठोकणारा हाच यशस्वी जयस्वाल. आता रविवारच्या अंतिम सामन्यावेळी यशस्वीकडेच अख्ख्या देशाच्या नजरा लागलेल्या असतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पण, मुंबई संघाला किंवा देशालाही हा हिरा गवसला कसा. विश्‍वचषकाच्या निमित्ताने सध्या दक्षिण आफ्रिकेत असलेले यशस्वीचे गुरू ज्वाला सिंग यांनी 'सकाळ'शी बोलताना सहा वर्षांपूर्वीचे ते क्षण सांगितले. यशस्वी हा ज्वाला सिंग यांनी घडविलेला पृथ्वी शॉनंतरचा दुसरा युवा खेळाडू. तेदेखील उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न घेऊन तेही मुंबईत आले होते. रमाकांत आचरेकर सरांकडे प्रशिक्षण घेतले होते. पण, मुंबईचे किंवा देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही. यशस्वीला सर्वप्रथम त्यांनी पाहिले ते आझाद मैदानावर. तो तिथे एका टेंटमध्ये राहतो, असे त्यांनी ऐकले होते. 12 वर्षांच्या यशस्वीने गाईल्स शिल्डमध्ये आधीच्या सामन्यात 47 धावा व 5 बळी अशी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. ज्वाला सिंग यांनी त्याला कार्ड दिले व घरी बोलावले. घरी आल्यानंतर त्याचे क्रिकेटवेड जाणून घेतले. तेव्हा वाटले की हा मुलगा आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करील. मनोमन ठरविलं की याला आपण घडवायचं. तेव्हापासून यशस्वी हा सिंग यांच्याकडेच राहतो. त्यांच्याकडेच तो लहानाचा मोठा झाला. 

भारतीय कलाकारांना नाचवून तो भारतविरोधी कारवायांनाच करायचा फंडिंग

त्या दिवसापासून हा मुलगा माझ्याकडे आहे, ज्वाला सिंग यशस्वीबद्दल भरभरून बोलतात. यशस्वी ज्या पुलच्या फटक्‍यासाठी ओळखला जातो, तो ज्वाला सिंग यांनी त्या कोवळ्या वयात बॉलिंग मशीनने ताशी 85 मैल वेगाचे चेंडू टाकून घोटला आहे. त्याशिवाय अनेक बारीक बारीक गोष्टीत लक्ष देऊन तंत्रात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

भयानक : लँडिग होतानाच विमानाचे तीन तुकडे; प्रवाशांचे काय झाले फोटो नक्की पाहा

यशस्वीप्रमाणेच छत्तीस वर्षीय ज्वाला सिंग स्वतः डावखुरे अष्टपैलू खेळाडू होते. 1995 पासून पूर्णवेळ प्रशिक्षणाचे काम करतात. मुंबई क्रिकेट क्‍लब व ज्वाला फाउंडेशनतर्फे सांताक्रूझला एअर इंडिया स्पोर्टस क्‍लब येथे ते उगवत्या क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देतात. धनराज पिल्ले व अन्य नामवंत खेळाडूंचे त्यांना पाठबळ आहे. यशस्वी जयस्वाल नावाच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम अजून संपलेले नाही. त्याला खूप मोठी मजल गाठायची आहे. विशेषत: तो मानसिक, शारीरिकदृष्ट्या फीट असावा, तंत्र परिपूर्ण असावे, यासाठी वेगवेगळे टास्क दिले जातात. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 75 हून अधिक आहे. एक विक्रमी द्विशतक त्याच्या नावावर आहे. अवघ्या अठरा वर्षांच्या यशस्वीला अजून प्रथम श्रेणी क्रिकेटचा खूप अनुभव घ्यायचा आहे. क्रिकेटच्या अन्य फॉरमॅटमधील गरजेनुसार खेळण्याची त्याची क्षमता असल्याचे सिंग यांना वाटते. 

राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्राकडून 'एक रूपया'

यशस्वीच्या एकाग्रतेबाबत मुंबईच्या 19 वर्षांखालील संघाचे तत्कालिन प्रशिक्षक सतीश सामंत एक घटना सांगतात- तीन वर्षांपूर्वी कुचबिहार करंडकाचा सामना सामना बीकेसीवर सुरू होता. त्याआधी आऊट साईड द ऑफ स्टंप चेंडू यशस्वी डीप मिडविकेट वरून खूप छान मारायचा, पण बऱ्याच वेळा त्याच फटक्‍यावर बादही व्हायचा. मी त्याला सांगितले, की आज तो सोडून तू कुठलाही फटका खेळ. त्याने निग्रहाने तो फटका टाळला आणि एका फ्लॅट षटकारासह नाबाद शतक केले! दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र तोच फटका खेळताना बाद झाला! 

गाईल्स स्पर्धेत 2015 साली यशस्वीने एकाच सामन्यात त्रिशतक व 13 बळी घेतले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये याची नोंद आहे. 19 वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेत तो मालिकावीर ठरला. विजय हजारे स्पर्धेत झारखंडविरुद्ध 154 चेंडूत 203 धावा काढताना त्याने 17 चौकार आणि तब्बल एक डझन षटकार ठोकले व सर्वात कमी वयाचा लिस्ट ए क्रिकेटमधील द्विशतकवीर म्हणून जागतिक विक्रमही नोंदविला. त्या वर्षीची स्पर्धेतील त्याची सरासरी 100 हून अधिक आहे. आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सने त्याला तब्बल 2 कोटी 40 लाख रुपये देऊन करारबद्ध केले आहे. 

loading image