केवळ सायमंड्स नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात मृत्यू |Cricketers who died in road Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cricketers who died in road Accident
केवळ सायमंड्स नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात मृत्यू

केवळ सायमंड्स नव्हे तर 'या' क्रिकेटपटूंचाही रस्ते अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. केवळ सायमंड्स नव्हे तर त्याच्यापूर्वी असे 5 क्रिकेटपटू आहेत ज्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: मोदी माझ्या काश्मीरी हिंदू बहिणींची व्यथा ऐका; रैनाने शेअर केला Emotional Video

बेन हॉलिओक

इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन हॉलिओक (Ben Hollioake) याचा 2002 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. केवळ १९ व्या वर्षी त्याने इंग्लंडकडून पदार्पण केले होते. पण, केवळ २४ व्या वर्षी त्याच्या कारचा अपघात झाला. पर्थमध्ये कार चालवत असताना, त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार भिंतीला धडकली होती.

त्याने इंग्लंड संघासाठी २० वनडे आणि २ कसोटी सामने खेळले होते.

कोली स्मिथ

वेस्ट इंडीजचे माजी अष्टपैलू कोली स्मिथ (Collie Smith) यांचे ९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लंडमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्यासह गॅरी सोबर्स देखील होते.

स्ट्रॉफोर्डशायरमधील स्टोन ए ३४ च्या रस्त्यावरून कार वेगात जात असताना पहाटे ४.४५ वाजता १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रक खुप वेगाने आला आणि तिची हेडलाईट सोबर्स त्यांच्या डोळ्यांवर चमकली, ज्यामुळे हा अपघात घडला.

स्मिथ यांनी २६ कसोटी सामन्यात ३१.७० च्या सरासरीने १.३३१ धावा आणि ४८ गडी बाद केले होते.

हेही वाचा: IPL च्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष

ध्रुव पंडोव

भारताचा क्रिकेटपटू ध्रुव पंडोव (Dhruva Pandove) याचाही कार अपघातात मृत्यू झाला होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. तो पंजाबकडून खेळला होता. १९९२ साली त्याचा वयाच्या १८ व्या वर्षी कार अपघात झाला होता. अंबाला जवळील रस्त्यावर त्याचा हा अपघात झाला होता.

नजीब तरकाई

६ ऑक्टोबर २०२० रोजी अफगाणिस्तानचा २९ वर्षीय खेळाडू नजीब तरकाई (Najeeb Tarakai) याचे निधन झाले होते. त्याचा २ ऑक्टोबर २०२० रोजी कार अपघात झाला होता. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर काहीदिवस उपचार करण्यात आले, पण मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

नजीब तरकाईने अफगाणिस्तानसाठी एक एकदिवसीय आणि १२ टी-२० सामने खेळले होते.

रुनाको मोर्टन

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रुनाको मोर्टन याचाही अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गाडी त्रिनिदादमधीस सोलमॉन हायवेवरील एका पोलवर धडकली होती. हा अपघात २०१२ साली झाला होता. त्यावेळी तो केवळ ३३ वर्षांचा होता.

त्याने १५ कसोटी सामने, ५६ वनडे आणि ७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले होते.

Web Title: Cricketers Who Died In Road Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top