esakal | मालामाल रोनाल्डो मॉडेलमुळं आला होता गोत्यात; मोजावी लागली मोठी किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

Cristiano Ronaldo

मालामाल रोनाल्डो मॉडेलमुळं आला होता गोत्यात; मोजावी लागली मोठी किंमत

sakal_logo
By
सुधीर काकडे

ख्रिस्टियानो रोनाल्डो...फुटबॉल विश्वातल्या या नावा भोवती एक मोठं वलय आहे. जगभरात रोनाल्डोचे (Cristiano ronaldo) लाखो चाहते आहेत. पुरुष फुटबॉलमध्ये रोनाल्डोने सर्वात जास्त गोल करण्याचा रेकॉर्ड नुकताच नोंदवला असुन, या रेकॉर्डसोबत त्याने इतिहास घडवला आहे. मॅंचेस्टर युनायटेडमध्ये जेव्हा तो परत आला तेव्हा चाहत्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. रोनाल्डोची आज पर्यंतची कारकिर्द गौरवशाली राहिली आहे. या सर्व कारकिर्दीमध्ये त्याने जगभरातील करोडो चाहत्यांचे प्रेम आणि विश्वास कमावला. यशाच्या पर्मोच्च शिखरावर पोहोचत असताना, दुसरीकडे रोनाल्डोच्या आयुष्याचा एक नकारात्मक भाग सुद्धा काळापासून लपुन राहिलेला नाही. हा नकारात्मक भाग म्हणजे रोनाल्डोवर लागलेला बलात्काराचा आरोप.

जगातील करोडो फुटबॉल प्रेमीच्या गळ्यातील ताईत असलेल्या रोनाल्डोवर एका प्रसिद्ध मॉडेलने १२ जून २००९ ला बलात्कार केल्याचा आरोप केला होता. अनेक दिवस चाललेल्या या प्रकरणाची सुरुवात १३ जून रोजी कॅथरीन मायोर्गा या मॉडेलने पोलिसात तक्रार दिल्यानंतर झाली होती. १२ जूनला लास वेगासच्या रेन नावाच्या एका क्लबमध्ये रोनाल्डो कॅथरीन मायोर्गा या मॉडेलला भेटला होता. या भेटीनंतर काही तासांत रोनाल्डो आणि ही मॉडेल हॉट-टब पार्टीसाठी गेले. Der Spiegel या जर्मन मासिकामधून समोर आलेल्या माहितीनुसार मॉडेलने सांगितले की, यावेळी आपण ड्रेस चेंज करत असताना रोनाल्डो जबरदस्तीने तिथे आला आणि त्याने माझ्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

Ronaldo eSakal

Ronaldo eSakal

कॅथरीन मायोर्गा (Kathryn Mayorga) यांनी पोलिसात तक्रार दिली त्यावेळी तिने पोलिसांना रोनाल्डोचे नाव सांगितले नाही, मात्र ज्या व्यक्तीवर आरोप आहेत ती व्यक्ती एक पब्लीक फिगर असून ॲथलिट आहे, असा उल्लेख केला होता. त्यानंतर या तरुणीच्या सहमतीने तीची तपासणी करण्यासाठी तिला युनिव्हर्सीटी सेंटरमध्ये नेण्यात आले, या तपासणीमध्ये तीच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.

रोनाल्डोला या प्रकरारणाच्या चौकशीदरम्यान एक प्रश्नावली देण्यात आली. रोनाल्डोसह त्याच्या सोबत हॉटेलमध्ये असणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना सुद्धा ही प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीमध्ये रोनाल्डोला एकच दोन वेळा विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताना मॉडेलला मिस ‘C’ संबोधण्यात आले होते. घटना घडली त्यावेळी मिस C ने विरोध केला होता का? या प्रश्नाची दोन वेगवेगळी उत्तर दिली. सप्टेंबरमध्ये रोनाल्डोने दिलेल्या उत्तरात तो म्हणाला की हो, तीने नको नको म्हणत विरोध केला होता. मात्र डिसेंबरमध्ये त्याने फक्त ‘नाही’, अर्थात ‘C’ ने विरोध केला नाही असे उत्तर दिले.

 Questionnaire

Questionnaire

हेही वाचा: KBC: धोनीबद्दलच्या प्रश्नावर सेहवाग-गांगुलीला घ्यावा लागला 'रिव्ह्यू'

जर्मन मासिक Der Spiegel ने दिलेल्या माहितीनुसार कागपत्रांमधून असेही समोर आले होते की, रोनाल्डोने हे कबूल केले होते की, ‘तिला ते नको होते, तिने विरोध केला होता. ती नाही म्हणत होती, मात्र तिचा सहभाग होता, ती त्यानंतर देखील नको नको म्हणत होती.’

पुढे जानेवारी २०१० मध्ये नॉन डिस्कोजर अग्रीमेंटने हे प्रकरण मिटले. रोनाल्डोने कॅथरिनला त्याच्यावर केलेले सर्व आरोप मिटवण्यासाठी $375,000 देत हे प्रकरण संपवले अशीही माहिती समोर आली आहे. सहाजिकच अशा घटनांमध्ये पुरावे गोळा करणे शक्य होत नाही, तसेच न्यायालयाबाहेर ही प्रकरणं मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर कॅथरिनने देखील या प्रकरणाचा पाठपुरावा न केल्याने हे प्रकरण संपले. आता पत्रकार ज्यावेळी तिला या प्रकरणाबद्दल विचारतात तेव्हा ती त्याबद्दल कुठलाही संवाद साधण्यास नकार देते.

पुढे #Me too चळवळीतुन हे प्रकरण पुन्हा समोर आले होते. या प्रकरणाबद्दल बोलताना त्याचे वकील हे प्रकरण माध्यमांनी रचलेली काल्पनीक कहाणी असुन, या प्रकरणात माध्यमांतुन समोर आलेल्या कागपत्रांवर रोनाल्डोची स्वाक्षरी नसल्याचे सांगितले होते. मात्र हा रोनाल्डोच्या सहिचा पुरावा देत माध्यमांनी हा पुरावा फेटाळून लावला होता.

Paper Cuttings

Paper Cuttings

loading image
go to top