
Chess World Champion D Gukesh: भारताचा १८ वर्षीय ग्रँडमास्टर डी गुकेश याने काही दिवसांपूर्वीच जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद २०२४ स्पर्धा जिंकली आणि इतिहास रचला. त्याने १४ व्या फेरीत चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेनला पराभूत केले आणि हे विजेतेपद पटकावले.
गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडूही ठरला. तसेच विश्वनाथन आनंद यांच्यानंतर हे विजेतेपद पटकणारा तो दुसराच भारतीयही आहे. त्यामुळे त्याच्या या यशाचे सध्या देशभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, त्याने ही स्पर्धा जिंकल्यानंतर आता त्याच्या कोचला दिलेलं वचन पाळलं आहे आणि भितीवर मात केली आहे.