

विश्वविजेता डी. गुकेशने आपल्या भेदक चालींनी पुन्हा एकदा आपले प्रभुत्व सिद्ध केले. येथे सुरू असलेल्या सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत त्याने रॅपिड विभागात विजेतेपदाला गवसणी घातली आहे. १९ वर्षीय गुकेशने संयम आणि अचूक डावपेचांनी प्रभावित करताना या स्पर्धेत १८ पैकी १४ गुण मिळवले आणि अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. त्यामुळे पुन्हा एकदा भारताच्या गुकेशचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.