IND vs SA : दीपक चाहर - उमेश यादवने लाज राखली! शतकी पराभव टाळला

Deepak Chahar Umesh Yadav Fight Back Prevent India Humiliating Defeat
Deepak Chahar Umesh Yadav Fight Back Prevent India Humiliating Defeatesakal

India Vs South Africa 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचे 228 धावांचे आव्हान पार करताना भारताचा डाव 178 धावात संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेने सामना 49 धावांनी जिंकत मालिकेचा शेवट गोड केला. दरम्यान, भारताची अवस्था 8 बाद 120 धावा अशी झाली होती. मात्र दीपक चाहरने 17 चेंडूत 31 धावांची खेळी करत उमेश यादवसोबत 9 व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचत भारताचा शतकी पराभव टाळला आणि लाज वाचवली. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक 46 धावा केल्या. द. आफ्रिकेकडून रॉसोने 48 चेंडूत नाबाद शतकी तर डिकॉकने 68 धावांची खेळी केली. तर पार्नेल, महाराज आणि एन्गिडीने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. (Deepak Chahar Umesh Yadav Fight Back)

Deepak Chahar Umesh Yadav Fight Back Prevent India Humiliating Defeat
Dinesh Karthik : पंत - डीकेचे प्रमोशन; धमाक्यात सुरूवात मात्र शेवट कडूच!

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ठेवलेल्या 228 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. रबाडाने रोहित शर्माचा शुन्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही 1 धावेची भर घालून माघारी परतला. दरम्यान, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी आक्रमक फलंदाजी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र एन्गिडीने 14 चेंडूत 27 धावा करणाऱ्या पंतला बाद करत पॉवर प्लेमध्ये भारताला तिसरा धक्का दिला.

पंत बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने आक्रमक फटेकेबाजी करत 6 षटकात 3 बाद 64 धावा केल्या. दिनेश कार्तिकने 21 चेंडूत तुफानी 46 धावांची खेळी केली. मात्र केशव महाराजने त्याला बोल्ड करत भारताला चौथा धक्का दिला. दरम्यान, सर्व मदार सूर्यकुमारवर असताना तो देखील 8 धावांची भर घालून माघारी परतला. हर्षल पटेलने 12 चेंडूत 17 धावा करत भारताला शतक पार करून दिले. मात्र एन्गिडीने त्याची देखील शिकार केली. भारताचा शेवटचा फलंदाज म्हणून घेणारा खेळाडू अक्षर पटेल देखील 9 धावांची भर घालून माघारी फिरला.

भारताचे रथी महारथी स्वस्तात माघारी गेल्यानंतर अश्विन देखील 2 धावा करून बाद झाला. मात्र दीपक चाहरने उमेश यादवच्या साथीने 26 चेंडूत 48 धावांची भागीदार रचली. अखेर दीपक चाहरची 17 चेंडूत केलेली 31 धावांची खेळी प्रेटोरियसने संपवली. चाहरच्या या खेळीमुळेत भारताचा शतकी पराभव टळला. उमेश यादवने 20 धावांची नाबाद खेळी केली. अखेर भारताचा डाव 178 धावात संपुष्टात आळा.

Deepak Chahar Umesh Yadav Fight Back Prevent India Humiliating Defeat
Jasprit Bumrah : स्टार्क.. IPL.. BBL वरून बुमराहला कानपिचक्या; #Starc होतोय ट्रेंड

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा हा फोल ठरवला. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉकने पॉवर प्लेमध्येच आक्रमक सुरूवात करत 4 षटकात 30 धावा चोपल्या. त्यात 25 धावा एकट्या डिकॉकच्या होत्या.

दरम्यान, उमेश यादवने चाचपडत खेळणाऱ्या टेम्बा बाऊमाला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र त्यानंतर आलेल्या रिली रॉसोने आल्या आल्या आक्रमक सुरूवात केली. दुसरीडे डिकॉकने आपले अर्धशतक पूर्ण करत आफ्रिकेला 10 षटकात 96 धावांवपर्यंत पोहचवले होते.

आफ्रिकेने 12 षटकात 1 बाद 120 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी मिळून भारताला दिलासा दिला. त्यांनी 43 चेंडूत 68 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या डिकॉकला धावबाद केले. डिकॉक बाद झाल्यानंतर रॉसोने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला 150 शतकाच्या पार पोहचवले.

रॉसोने स्टब्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांनची भागीदारी रचली. त्यामुळे 19 व्या षठकात आफ्रिकेने 200 धावांचा टप्पा पार केले. दरम्यान, रॉसोने आपले शतक 48 चेंडूत पूर्ण केले. अखेर स्टब्स 23 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने दीपक चाहरच्या शेवटच्या षटकात 24 धावा चोपून आफ्रिकेला 227 धावांपर्यंत पोहचवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com