

Deepti Sharma’s Record Breaking Performance Leads India To World Cup Glory
Esakal
शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या कामगिरीच्या जोरावर महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला ५३ धावांनी नमवलं. यासह भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिलं वहिलं विश्वविजेतेपद पटकावलं. या सामन्यात दीप्ती शर्मानं फलंदाजी आणि गोलंदाजीतही कमाल केली. तिने अर्धशतक झळकावल्यानंतर पाच विकेटही घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कारही देण्यात आला.