IPL 2020 : लिलावात मिळाले 7.75 कोटी; खेळाडू म्हणतोय, 'आनंद पोटात माझ्या माईना रं माईना'! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shimron-hetmyer-DC

दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात वेस्ट इंडिजचा तुफानी सलामीवीर शिमरॉन हेटमायरला दाखल केले आहे. त्यासाठी कॅपिटल्सने तब्बल 7.75 कोटी मोजले आहेत.

IPL 2020 : लिलावात मिळाले 7.75 कोटी; खेळाडू म्हणतोय, 'आनंद पोटात माझ्या माईना रं माईना'!

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा लिलाव गुरुवारी (ता.19) कोलकाता येथे पार पडला. या लिलावात अनेक भारतीय तसेच परदेशी खेळाडूंवर कोटींची बोली लावली गेली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात वेस्ट इंडिजचा तुफानी सलामीवीर शिमरॉन हेटमायरला दाखल केले आहे. त्यासाठी कॅपिटल्सने तब्बल 7.75 कोटी मोजले आहेत. आपल्याला आयपीएलच्या लिलावात मिळालेली किंमत ऐकून हेटमायर चक्क नाचू लागला आहे. याचा एक व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ट्विटर पेजवरून पोस्ट केला आहे.

- IPL 2020 : वयाच्या ४८व्या वर्षी लिलाव; यंदा 'या' खेळाडूचे आहे सर्वाधिक वय

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. त्याअगोदर झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 12 सामन्यात 440 धावांची बरसात केली आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता 148.14.

- IPL 2020 : विराट आता हैदराबादच्या ताफ्यात; सनरायझर्सने मोजले 10 पट जास्त पैसे

त्यानंतर भारताविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यात हेटमायरने तुफानी खेळी साकारल्या आहेत. त्यात एका शतकी खेळीचा समावेश आहे. 

IPL 2020 साठी दिल्लीने लावली या खेळाडूंवर बोली :

जेसन रॉय (1.5 कोटी), ख्रिस वोक्स (1.5 कोटी), अ‍ॅलेक्स कॅरी (2.4 कोटी), शिमरॉन हेटमायर (7.75 कोटी), मोहित शर्मा (50 लाख), तुषार देशपांडे (20 लाख), मार्कस स्टोनिस (4.80 कोटी), ललित यादव (20 लाख)

- IPL 2020 : पंजाबचा बॅटींग कोच झाला आता नवा कर्णधार पाहा!

IPL 2020 साठी असा असेल दिल्ली कॅपिटल्सचा संघ :
श्रेयस अय्यर, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, आर. अश्विन, रिषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्सर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, संदीप लमिच्चने, जेसन रॉय, ख्रिस वोक्स, अ‍ॅलेक्स कॅरी, शिमरॉन हेटमायर, मोहित शर्मा, तुषार देशपांडे, मार्कस स्टोनिस, ललित यादव. 

टॅग्स :India