FIFA World Cup 2026: पोटासाठी कारखान्यात मजुरी अन् स्वप्नासाठी फुटबॉल... दुहेरी लढाई लढणारा पोरगाच ठरला जर्मनीचा 'तारणहार'

Deniz Undav Factory Worker to World Cup Hero: १२ वर्षांपूर्वी पहाटे ४ वाजता उठून कारख्यान्यात मजुरी करून नंतर फुटबॉलही खेळून तो मेहनत करायचा. तोच खेळाडू शनिवारी रात्री जर्मनीचा हिरो ठरला. जाणून घ्या त्याची कहाणी.
Deniz Undav | Germany

Deniz Undav | Germany

Sakal

Updated on

२० जून २०२६ ची रात्र जर्मनी फुटबॉल संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये अस्तित्वाची लढाई लढत होते. याच सामन्यात अचानक मैदानात एक खेळाडू येतो आणि साधारण अर्धातासात असा काही खेळ करतो की जर्मनीला थेट बाद फेरीत पोहचवतो, ज्याच्यामुळे पुन्हा एकदा जर्मनीच्या विश्वविजेतेपद जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आज जागतिक स्तरावर आपल्या कौशल्याच्या जोरावर चमकणाऱ्या या खेळाडूने १२ वर्षांपूर्वी कारखान्यात घाम गाळत होता. हा खेळाडू म्हणजे जर्मनीचा २९ वर्षांचा डेनिझ अंडाव. पोटासाठी मजुरी आणि स्वप्नासाठी फुटबॉल अशी दुहेरी लढाई लढत तो इथपर्यंत पोहचला आहे.

Deniz Undav | Germany
Fifa World Cup 2026: ९२ वर्षानंतर पहिला विजय... इजिप्तसाठी मोहम्मद सलाह हिरो ठरला; संघासाठी वर्ल्ड कपमध्ये नोंदवले सर्वाधिक गोल
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com