डॅरेन सॅमीला कोणी आणि कधी म्हटले होते 'काळू' ? ; वाचा सविस्तर...

deren samy
deren samy

नवी दिल्ली ः आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघातून खेळताना आपल्याविरुद्धही वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली होती, या वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीने केलेल्या आरोपाबाबत काही संघसहकाऱ्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली असली, तरी इशांत शर्माच्या 2014 मधील पोस्टमध्ये त्याने सॅमीचा 'काळू' म्हणून उल्लेख केल्याचे उघड झाले आहे. 

अमेरिकेत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांची अमेरिका पोलिस अधिकाऱ्याने गुडघ्याने श्वास कोंडून निर्घृण हत्या केल्यानंतर जगभरात वातावरण पेटले आहे. कृष्णवर्षीय खेळाडूही आपल्याला कसा वर्णभेदाचा सामना करावा लागला, याची खंत व्यक्त करत आहेत.  क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने तर आयसीसीने याबाबत पुढाकार घ्यायला हवा, असे सुचवले होते. इतकेच नव्हे तर आयपीएलमध्ये खेळत असताना काही संघसहकाऱ्यांनी आपल्याला उद्देशून 'काळू' असा शब्दप्रयोग केला असल्याचा आरोप केला होता. त्या वेळी आपल्याला या शब्दाचा अर्थ कळला नव्हता; परंतु आता या शब्दाची भीषणता समजली आहे, असे तो म्हणाला. 

सॅमीच्या या आरोपावर हैदराबाद संघातील त्याचे तत्कालीन सहकारी इरफान पठाण आणि पार्थिव पटेल यांनी मात्र कानावर हात ठेवले होते. असे काही घडले नसल्याचे ते म्हणाले होते; परंतु इशांत शर्माने 2014 मध्ये केलेली इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली. त्यात त्याने भुवनेश्वर, डेल स्टेन आणि सॅमीबरोबरचे छायात्रित पोस्ट केले होते. त्यात सॅमीचा उल्लेख 'काळू' म्हणून केला आहे. सॅमी स्वतःहून स्वतःचा उल्लेख 'काळू' म्हणून करत होता, असे  काहींचे म्हणणे आहे. 2013 आणि 2014 या मोसमात मी हैदराबाद संघातून खेळत होतो. त्या वेळी याच नावाने माझा उल्लेख केला जायचा, असे सांगताना सॅमीने त्या सर्वांकडून  माफी मागण्याची मागणी केली आहे. 

चुका कबूल करा; माफी मागा 
कोण कोण मला काळू म्हणत होते, ते सर्व जण जाणून आहेत. मला कोणाची नावे सांगण्याची गरज नाही. तुम्ही चुक कबूल करा आणि दिलगिरी व्यक्त करा, असे सॅमीने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com