World Cup 2023 : पहिला सामना हरलेल्या इंग्लंडचा रडीचा डाव, म्हणे भारतातील 'ही' खेळपट्टी खराब...

Dharamshala outfield not ideal for World Cup - Jos Buttler.
Dharamshala outfield not ideal for World Cup Jos Buttler
Dharamshala outfield not ideal for World Cup Jos ButtlerEsakal

Dharamshala outfield not ideal for World Cup Jos Buttler :

2023 वर्ल्डकप सुरू झाला असून दररोज एकापेक्षा जास्त रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. यादरम्यान इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यापूर्वी धर्मशालाच्या मैदानावरून वाद सुरू झाला आहे.

वास्तविक, धर्मशाला येथील एचपीसीपीए मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने असे काही बोलले आहे, ज्यामुळे थेट एचपीसीएवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत. इंग्लंडच्या कर्णधाराने सामन्याच्या एक दिवस आधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत धर्मशाला मैदान खराब असल्याचे वर्णन केले.

Dharamshala outfield not ideal for World Cup Jos Buttler
Team India WC23 : रोहित अन् कोच राहुल टेन्शनमध्ये, अफगाणिस्तानविरुद्ध स्टार ओपनर होणार बाहेर?

बटलरने सांगितले की, माझ्या मते धर्मशाला मैदानाचे आऊटफिल्ड खराब आहे. मैदानावर डायव्हिंग करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा प्रत्येक धाव वाचवण्यासाठी तुम्ही क्षेत्ररक्षणात सर्वकाही देता. मात्र धर्मशाळेच्या मैदानाचे आऊटफिल्ड हवे तसे चांगले नाही.

Dharamshala outfield not ideal for World Cup Jos Buttler
Shahid Afridi : "मटण खायला सुरू केलं म्हणून..." भारतीय बॉलर्सच्या कामगिरीवरून आफ्रिदीचे वादग्रस्त विधान

याआधी बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात धर्मशालाच्या आउटफिल्डवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अफगाणिस्तानचे कोच जोनाथन ट्रॉट यांनी शनिवारी धर्मशाला स्टेडियममधील आऊटफिल्डवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, त्यांचा संघ नशीबवान आहे की क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंना दुखापत झाली नाही. तर सामन्यात खराब आउटफिल्डमुळे दोन्ही संघांचे खेळाडू क्षेत्ररक्षणादरम्यान काही वेळा घसरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com