'तेव्हा ऋतुराज गायकवाडची निवड करुन काहीच उपयोग नाही'

तेव्हा ऋतुराज गायकवाडची निवड करुन काहीच फायदा नाही : वेंगसरकर
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad esakal

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India Tour Of South Africa) भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली. त्यानंतर आता एकदिवसीय संघाच्या घोषणेची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाची धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवली. त्यानंतर संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीत दमदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) देखील नाव समोर येत आहे.

Ruturaj Gaikwad
सर्वात यशस्वी ODI कॅप्टन कोण, सौरभ की विराट?

ऋतुराजला संघात संधी देण्याबाबत भारताचे माजी कर्णधार आणि माजी निवडसमिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी देखील आपले प्रतिक्रिया दिली. त्यांनी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आता २४ वर्षांचा आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफीत (Vijay Hazare Trophy) पाठोपाठ तीन शतके ठोकली आहे. अजून त्याने काय सिद्ध करायचे आहे? त्याला २८ व्या वर्षी संधी देऊन काय उपयोग? असे म्हणत ऋतुराजला संधी मिळावी असे सांगितले.

ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफीत छत्तीसगड मध्य प्रदेश विरुद्ध शतकी खेळी केली. त्याने मध्य प्रदेश विरुद्ध १३६ धावांची खेळी केली. त्यानंतर छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने नाबाद १५४ धावांची दीडशतकी खेळी साकारली. तो इथेच थांबला नाही तर त्याने केरळ विरुद्ध देखील ( १२४ ) शतक ठोकत भारतीय संघातील आपली दावेदारी सिद्ध केले.

Ruturaj Gaikwad
कोण आहे प्रियांक पांचाल? ज्यानं कसोटीत घेतली रोहितची जागा

'तुम्ही या खेळाडूला संघात स्थान दिले पाहिजे. त्याने अजून स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून किती धावा करुन दाखवायच्या? ऋतुराजला निवडण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याला योग्य संधी देण्यात यावी.' अशी प्रतिक्रिया दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

वेंगसरकर पुढे म्हणाले की, 'तो तिसऱ्या क्रमांकावरही फलंदाजी करु शकतो. त्याला संघात सामावून घेतले पाहिजे. ऋतुराज गायकवाड हा १८, १९ वर्षाचा नाहीये. त्याला २८ व्या वर्षी संघात घेण्यात काहीच अर्थ नाही.'

Ruturaj Gaikwad
विराट कोहली - रोहित शर्मा एकमेकांचे तोंड पाहणार नाहीतच का?

चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये १६ सामन्यात ६३५ धावा केल्या. तो ऑरेंज कॅपचा मानकरीही ठरला होता. तो आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयाचा ऑरेंज कॅप (Orange Cap) मिळवणारा खेळाडू देखील ठरला होता. चेन्नईने त्याला ६ कोटी देऊन पुढच्या हंगामासाठी रिटेन देखील केले आहे.

ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा सदस्यही होता. त्याने या मालिकेत टी २० आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील केले होते. तो नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० मालिकेत देखील भारतीय संघात होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com