Dinesh Karthik : कार्तिकची दुखापत गंभीर! बांगलादेशविरुद्धचा सामना मुकणार?

दक्षिण आफ्रिकेकडून पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का, कार्तिक दुखापतीमुळे बाहेर ?
Dinesh Karthik
Dinesh Karthiksakal

Dinesh Karthik : भारतीय संघातील सर्वांत जास्त वयाचा खेळाडू असलेला तरीही मॅच फिनिशर म्हणून संघात स्थान कायम राखणारा दिनेश कार्तिक बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. रविवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत कार्तिकची पाठ दुखावली आहे.

Dinesh Karthik
Hardik Pandya : T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाला मिळाला नवीन 'कर्णधार'

रिषभ पंतऐवजी पसंती मिळालेल्या कार्तिकला या विश्वकरंडक स्पर्धेत तीन सामन्यात संधी देऊनही त्याला छाप पाडता आलेली नाही. तीन लढतीत मिळून त्याल केवळ १५ धावा करता आल्या आहेत आणि त्यात एकच षटकार मारता आलेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत १५ व्या षटकात कार्तिकला पाठ दुखापतीचा त्रास जाणवू लागला होता. गुडघ्यावर हात ठेवून तो काही काळ राहिला होता. फिजिओंनी मैदानात जाऊन उपचार केले, परंतु पाठ धरूनच तो ड्रेसिंग रूममध्ये परतला.

Dinesh Karthik
T20WC : ऑस्ट्रेलियाच्या विजयाने इंग्लंडची गोची, आयर्लंडला हरवून पॉइंट टेबलमध्ये...

कार्तिकची दुखापत किती गंभर आहे याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. स्नायू ताणल्याचे सांगण्यात येत आहे. पर्थमध्ये काल कमालीची थंडी असल्यामुळे परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कार्तिकची पाठ दुखावली असल्याच्या वृत्ताला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दुजोरा दिला. फिजिओ अंतिम अहवाल देतील आणि त्यानंतर त्याच्या दुखापतीचा निश्चित अंदाज येईल, असे भुवनेश्वर कुमार म्हणाला.

Dinesh Karthik
Shoaib Akhtar : पराभव भारताचा शोककळा पाकिस्तानात; अख्तर म्हणाला, "भारताने.."

भारताचा बांगलादेशविरुद्धचा सामना बुधवारी अॅडलेड येथे होणार आहे. तंदुरुस्त होण्यासाठी कार्तिककडे केवळ ७२ तास आहेत; मात्र यात पर्थ ते अॅडलेड असा प्रवासही करायचा आहे. कार्तिक मैदानाबाहेर गेल्यानंतर अखेरच्या पाच षटकांत पंतने यष्टिरक्षण केले. ऑस्ट्रेलियातील अधिक उसळी असलेल्या खेळपट्ट्यांवर कार्तिक अडखळत असल्यामुळे बांगलादेशविरुद्ध तरी पंतला संधी मिळण्याची संधी अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com