FIFA World Cup: स्पेनच्या सेलिब्रेशनमध्ये ट्रम्प यांची 'बिनधास्त' एन्ट्री! फिफा अध्यक्षांनी ओढून करावं लागलं बाजूला, Video Viral

Donald Trump FIFA World Cup 2026 Podium Moment: स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाला पराभूत करत फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. पण त्यांच्या सेलिब्रेशनवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चर्चेचा विषय ठरले. त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Donald Trump FIFA World Cup 2026 Podium Moment

Donald Trump FIFA World Cup 2026 Podium Moment

Sakal

Updated on

FIFA World Cup Spain Victory News: तब्बल १६ वर्षांनंतर स्पेनने पुन्हा एकदा फिफा वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. रविवारी न्यू जर्सीमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेटिनावर स्पेनने १-० अशी मात केली आणि फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत रोमांचक सामना झाला.

पण अखेरच्या क्षणी स्पेनच्या फेरान टोरेसने संधीचा फायदा उठवित बहारदार गोल केला आणि स्पेनच्या संघाने एकच जल्लोष केला. दरम्यान, या सामन्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) त्यांच्या कृतीमुळे पुन्हा चर्चेत आले.

Donald Trump FIFA World Cup 2026 Podium Moment
Fifa World Cup Final: फुल राडा... अर्जेंटिनाचे खेळाडू हाणामारीवर उतरले, स्पेनच्या खेळाडूचा गळा दाबला, एकाला उचलून आपटले Video
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com