

Ecuador Stuns Germany 2-1 | FIFA World Cup 2026
Sakal
Massive FIFA World Cup Upset,Ecuador vs Germany : फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत गुरुवारी (२५ जून) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. इक्वेडोर संघाने चार वेळच्या विजेत्या जर्मनीला २-१ अशा फरकाने पराभूत करत इतिहास घडवला. या सामन्यापूर्वी इक्वेडोरचे आव्हान कायम राहिल की नाही, याचीही खात्री नव्हती.
मात्र त्यांनी जर्मनीला पराभूत करत ग्रुप ई मध्ये (Group E) तिसरा क्रमांक मिळवला. यामुळे अंतिम ३२ संघांमध्ये पोहचण्यासाठी सर्वोत्तम तिसऱ्या क्रमांकावरील ८ संघांमध्ये त्यांचाही समावेश झाला. यामुळे इक्वेडोरने आपले आव्हान कायम ठेवले.
तब्बल २० वर्षांनंतर इक्वेडोरने साखळी फेरीचा अडथळा पार करत नॉकआऊट फेरीत (Knock Out Stage) प्रवेश केला आहे. यंदाच्या स्पर्धेतील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक निकाल मानला जात आहे.