
ENG vs IND : विराट कोहलीसाठी इंग्लंडचा कर्णधार बटलर पत्रकाराला भिडला
लंडन : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) दुखापतीतून सावरत इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात खेळला. त्याने आपल्या डावाची चांगली सुरूवात करत डोळ्यांचे पारणे फेडणारे काही फटके मारले. मात्र त्याला ही चांगली सुरूवात मोठ्या धावात परावर्तित करता आली नाही. त्याला डेव्हिड विलीने 16 धावांवर बाद केले. विराट बाद झाल्या झाल्या त्याच्या खराब फॉर्मवर सर्व स्तरावर चर्चा सुरू झाली. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार (England Captain) जोस बटलरला (Jos Buttler) देखील विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचाण्यात आला. त्यावेळी बटलरने विराटचे समर्थन केले.
हेही वाचा: Virat Kohli : 'ही वेळ देखील निघून जाईल' बाबर आझमची भावनिक पोस्ट
पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला, 'मी सर्वांना एक आठवण करून देतो की तो देखील एक माणूस आहे. त्याच्याकडूनही धावा होणार नाहीत. मात्र तरी देखील तो सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. तो फक्त वनडेमधील नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. तो गेल्या अनेक वर्षापासून उत्तम खेळ करणारा खेळाडू राहिला आहे. सर्व फलंदाज या परिस्थितीतून जातात मात्र काही काळानंतर ते धावा करायला सुरूवात करतात.'
जॉस बटलर पुढे म्हणाला की, 'मात्र एक निश्चित आहे की विरोधी संघाचा कर्णधार म्हणून अशा दर्जाचा खेळाडू डोकेदुखी असते. तुम्ही फक्त त्याचा फॉर्म आमच्याविरूद्ध परत येऊ नये अशीच आशा करता. त्याचे रेकॉर्ड्सच (Virat Kohli Record) त्याच्या कामगिरीबद्दल बोलतात. त्याने अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह का उपस्थित करताय?'
हेही वाचा: CSK चा 'हा' खेळाडू दुसऱ्यांदा बनला बाप; इंस्टावर शेअर केली खास पोस्ट
विराट कोहलीने त्याचे शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक 2019 मध्ये ठोकले होते. त्यानंतर विराटला शतकी खेळी करण्यात अपयश येत आहे. तो एजबेस्टन कसोटी आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20 मालिकेत देखील फेल गेला होता. विराट कोहलीने वेस्ट इंडीज विरूद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेतून विश्रांती घेतली आहे. विराटला ब्रेकवर जाण्यापूर्वी इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात आपला फॉर्म पुन्हा परत आणण्याची संधी आहे.
इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने भारतासमोर 247 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संघ 147 धावातच गारद झाला. इंग्लंडने सामना 100 धावांनी जिंकून मालिकेत 1 - 1 अशी बरोबर साधली. आता मालिकेचा विजेता 17 जुलैला होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ठरेल.
Web Title: England Captain Jos Buttler Came In Support For Virat Kohli During Press Conference
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..