IND vs BAN: ... म्हणुन पंतऐवजी पुजारा झाला उपकर्णधार! केएल राहुलने केला मोठा खुलासा

IND vs BAN KL Rahul Press Conference
IND vs BAN KL Rahul Press Conferencesakal

IND vs BAN KL Rahul Press Conference : बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावलेल्या टीम इंडियासमोर आता कसोटीचे आव्हान आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीला बुधवारपासून चितगावमध्ये सुरुवात होणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार नाही, तो अद्याप तंदुरुस्त नाही. त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुल कर्णधार असणार आहे. आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराची उपकर्णधार म्हणून निवड केल्याबद्दल चाहते BCCI वर टीका करत आहे. मात्र आता राहुलने यावर मौन सोडले आहे.

IND vs BAN KL Rahul Press Conference
Team India: बदल तर होणारच! BCCIने रोहित अन् विराटचे केलं 'पॅकअप'?

रोहितच्या नेतृत्वाखाली भारताचे भावी कर्णधार म्हणून तयार होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जसप्रीत बुमराह आणि राहुलसह पंतचा समावेश करण्यात आला होता. पुजारा रडारवर देखील नव्हता आणि खरं तर मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याला वगळण्यात आले होते. परंतु बांगलादेशविरुद्ध बीसीसीआयच्या निर्णयामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, पंतऐवजी पुजाराला उपकर्णधार का करण्यात आले आहे, हे राहुलने स्पष्ट केले.

IND vs BAN KL Rahul Press Conference
Virat Kohli : कोणतीही ट्रॉफी तुझे फुटबॉलमधील योगदान... कोहलीने रोनाल्डोसाठी लिहिली भावनिक पोस्ट

दरम्यान, राहुलने कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत पंतऐवजी पुजाराला उपकर्णधार का करण्यात आले आहे, हे स्पष्ट केले. अशा निर्णयांमुळे संघातील खेळाडूची जबाबदारी बदलत नाही, असे राहुलने सांगितले. यासोबतच कर्णधार किंवा उपकर्णधार निवडण्यासाठी कोणते निकष काय आहेत याची माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. तो म्हणाले की मला निवडीचे निकष माहित नाहीत. मला उपकर्णधार बनवतानाही खुशीची गरज होती, पण निर्णय कोण घेतो हे माहीत नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com