Team India: बदल तर होणारच! BCCIने रोहित अन् विराटचे केलं 'पॅकअप'? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rohit sharma virat kohli

Team India: बदल तर होणारच! BCCIने रोहित अन् विराटचे केलं 'पॅकअप'?

India T20 Team : सध्या भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. जिथे संघाने प्रथम 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली आणि आता 14 डिसेंबरपासून भारताला 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याचवेळी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झालेला कर्णधार रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. बांगलादेशहून परतल्यानंतर भारताला पुढील 3 महिन्यांत मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवायचे आहे. सर्वांच्या नजरा देशांतर्गत हंगामाकडे लागल्या आहेत, कारण भारतीय संघ देशांतर्गत हंगामात बदललेला पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: Virat Kohli : कोणतीही ट्रॉफी तुझे फुटबॉलमधील योगदान... कोहलीने रोनाल्डोसाठी लिहिली भावनिक पोस्ट

आता येणाऱ्या बातम्यांनुसार दोन वेगवेगळे भारतीय संघ देशांतर्गत हंगामात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार रोहित आणि विराट कोहलीसह अनेक सीनियर्सना टी-20 संघातून वगळले जाऊ शकते आणि त्यांना एकदिवसीय आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले जाऊ शकते.

हेही वाचा: Virat Kohli : विराट कोहलीने 200 शतकं ठोकली तरी... पाकिस्तानचा माजी खेळाडू वक्तव्य करून आला चर्चेत

पुढचा टी-20 विश्वचषक 2024 मध्ये खेळला जाणार आहे. हे लक्षात घेऊन बीसीसीआय एक नवीन संघ तयार करण्याचा विचार करत आहे. ज्याची सुरुवात देशांतर्गत हंगामापासून होऊ शकते. वृत्तानुसार हार्दिक पांड्या डोमेस्टिक सीझनमध्ये टी-20 संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर रोहित वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. तेव्हापासून त्याला टी-20 चा कर्णधार बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.