Mark Wood : मन में लड्डू फूटा! इंग्लंडच्या धडाडणाऱ्या तोफेत लढाईपूर्वीच पाणी?

Mark Wood Injury IND vs ENG T20 World Cup 2022
Mark Wood Injury IND vs ENG T20 World Cup 2022 ESAKAL

Mark Wood Injury IND vs ENG T20 World Cup 2022 : भारत आणि इंग्लंड या यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमधील दोन तुल्लबळ संघांमध्ये 10 नोव्हेंबरला अॅडलेडवर सेमी फायनल सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिले असताना इंग्लंडच्या गोटातून एक बातमी आली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मार्क वूडने भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यापूर्वीच्या सरावातून माघार घेतली आहे. मार्क वूडला दुखापत झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंडसाठी ही डोकेदुखीची बाब असली तरी भारतासाठी मात्र बातमी चांगली ठरू शकते.

Mark Wood Injury IND vs ENG T20 World Cup 2022
Rohit Sharma : टॉस का बॉस रोहित अॅडलेडवर मात्र टॉस हरावा कारण..

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हा सेमी फायलन सामन्यापूर्वीच्या ऐच्छिक सराव सत्राला हजर नव्हता. त्याच्या स्नायूंवर जास्त ताण पडल्याचे जाणवत असल्याने त्याने सराव सत्राला हजेरी लावली नाही असे सांगण्यात येत आहे. मोठ्या सामन्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट संघव्यवस्थापन वूडच्या बाबतीत कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्याच्या उजव्या कोपरावर दोन शस्त्रक्रिया झाला आहेत. त्यानंतर त्याला पूर्ण उन्हाळी हंगामाला मुकावे लागले होते.

मार्क वूड हा एकमेव इंग्लिश खेळाडू नाही जो दुखापतीने त्रस्त आहे. यापूर्वी इंग्लंडचा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा डेव्हिड मलान देखील दुखापतीमुळे भारताविरूद्धच्या सेमी फायनलला मुकला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात मलानच्या मांडीचा स्नायू दुखावला होता.

Mark Wood Injury IND vs ENG T20 World Cup 2022
IND vs ENG : रोहित - हार्दिक नाहीत फॉर्ममध्ये; विराट - सूर्याच्या जीवावर टीम इंडिया किती तग धरणार?

दरम्यान, मोईन अलीने मलानची दुखापत गंभीर अशल्याचे सांगत तो भारताविरूद्धचा सेमी फायनल सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. मोईन अली म्हणाला होता की, 'मलान हा गेल्या काही वर्षापासून आमच्यासाठी चांगली कामगिरी करतोय. मी खरं सागू का त्याची दुखापत गंभीर वाटते आहे. तो काल स्कॅन करण्यासाठी गेला होता. तो परत आलाय मात्र आम्हाला त्याच्या दुखापतीबाबत फारशी कल्पना नाही मात्र तो फार बरा दिसत नाहीये.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com