फाफ डुप्लेसी भारतीय संस्कृतीच्या प्रेमात, म्हणाला...

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीने भारतीय संस्कृतीबद्दल वक्तव्य करत जिंकलं सर्वांचे मनं.
faf du plessis
faf du plessis esakal

आयपीएल क्वालिफायर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसीने भारतीय संस्कृतीबद्दल वक्तव्य करत सर्वांचे मनं जिंकल आहे.

faf du plessis
'कोहलीचा रेकॉर्ड नाही तर स्वप्न मोडू शकतो' चाहत्यांनी शेअर केले मीम्स

मॅचनंतर डुप्लेसीसने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, यंदाच्या सीझनमध्ये युवा खेळाडूंनी खूप प्रभावित केले. भारतीय क्रिकेटला उत्तम भविष्य आहे, आयपीएल नंतर तुम्ही नेहमीच तीन भारतीय संघ निवडू शकता, ज्यात तरुण खेळाडूंचा समावेश आहे. जेव्हा मी फ्रेंचायझीमध्ये सामील झालो तेव्हा ही सर्वात स्पष्ट गोष्ट होती.

आरसीबीसाठी हा सिझन चांगला होता. मला खरंच खूप अभिमान आहे. भारतातील लोकांबद्दल आम्हाला खूप आदर आहे. हा भारतीय संस्कृतीचा एक चांगला भाग आहे. स्टेडियममध्ये होणाऱ्या आरसीबी आरसीबीच्या जयघोषाने मी मंत्रमुग्ध झालो तर खेळाडू भावूक झाले.

भारतात क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला मिळणारा पाठिंबा उल्लेखनीय आहे. सर्वांनी छान खेळा केला, खूप खूप धन्यवाद. असे म्हणत्या सर्वांचे आभार मानलं.

faf du plessis
'हा तो विराट नाही जो आम्ही ओळखतो'

तसेच, आरसीबीच्या या कर्णधाराने यावेळी हॉटेल व्यवस्थापनाचे कौतुकही केले. "हे अविश्वसनीय आहे, केवळ बायोबबलच नाही तर आम्हाला भारतातील लोकांबद्दल खूप आदर आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये परत जाता आणि तेथे नेहमी रात्री ३ पर्यंत लोक काम करतात. आणि पुन्हा सकाळी ७ वाजता नाश्त्यासाठी ते लोक उठतात.

एक संघ म्हणून आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ, पण मला माहित आहे की हे संपूर्ण भारतात घडते. ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. अशा शब्दात त्याने तो भारतीय संस्कृतीचे कौतुक केले.

faf du plessis
RCB ला ती चूक चांगलीच महागात पडली; एका मॅचसाठी तरसत होता 'हा' खेळाडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएल २०२२ चा प्रवास क्वालिफायर 2 मधील पराभवाने संपला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रजत पाटीदारच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने 157 धावा केल्या. जोस बटलरच्या झंझावाती शतकाच्या जोरावर राजस्थानने 11 चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com