
Australia vs India 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना शनिवारी ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर सुरू झाला. मात्र, या सामन्याच्या पहिल्याच दिवसावर पावसाचे पाणी पडले. या सामन्यात पहिल्या दिवशी फक्त १३.२ षटकांचा खेळ होऊ शकला. म्हणजे फक्त ८० चेंडू या सामन्यात टाकण्यात आले.
सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाची शक्यता ब्रिस्बेनमध्ये वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याचे हे अंदाज योग्य ठरले आणि खरोखर शनिवारी संततधार पाऊस सुरू राहिला.