FIFA WC Final: 'गोल्डन ग्लोब' ट्रॉफीसोबत अर्जेंटिनाच्या गोलकीपरने केले अश्लील कृत्य

ट्रॉफी घेतल्यानंतर त्याने असे काही केले की सर्वांच्या भुवया उंचावल्या
Argentina goalkeeper Emiliano Martinez
Argentina goalkeeper Emiliano Martinez sakal
Updated on

Argentina goalkeeper Emiliano Martinez : अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक 2022चे विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने 'गोल्डन ग्लोब' ट्रॉफी जिंकली. ही ट्रॉफी जिंकल्यानंतर तो खूप आनंदी दिसत होता, पण या आनंदात त्याने असे अश्लील कृत्य केले, ज्यामुळे कदाचित संपूर्ण जग संतापले असेल. मार्टिनेझच्या या कृत्याने कतारचे अधिकारीही नाराज दिसत आहे.

Argentina goalkeeper Emiliano Martinez
Team India: BCCI 'या' तारखेला ठरवणार रोहित-द्रविडचे भवितव्य, दोघांचाही होणार पत्ता कट

पुरस्कार सोहळ्यादरम्यान, एमिलियानो मार्टिनेझ त्याची 'गोल्डन ग्लोब' ट्रॉफी घेण्यासाठी मंचावर पोहोचला. ट्रॉफी घेतल्यानंतर त्याने असे काही केले की भुवया उंचावल्या आहेत. मार्टिनेझचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, ज्यावर आता सर्वांकडून टीका होत आहे.

Argentina goalkeeper Emiliano Martinez
Video : इतका आनंद झाला की, तिनं ब्रा... फायनलमध्ये रंगली तिचीच चर्चा

मार्टिनेझची ट्रॉफी हाताच्या आकाराची होती, जी त्याने आपल्या प्रायव्हेट पार्टवर ठेवून सेलिब्रेट केली. त्याच्या या कृतीवर प्रसारकांनीही संताप व्यक्त केला. मार्टिनेझने अतिरिक्त वेळेत शानदार किक वाचवून विजय निश्चित करण्यात भूमिका बजावली. 30 वर्षीय मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी 2022 च्या विश्वचषकात फ्रान्सविरुद्धच्या विजयात नायकाची भूमिका बजावली होती, परंतु त्याचे अश्लील कृत्य आता त्याच्या विरोधात जात आहे.

अंतिम फेरीत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा 4-2 असा पराभव केला. 1986 नंतर देशाचे हे पहिले आणि एकूण तिसरे विजेतेपद आहे. अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला. यापूर्वी त्याने 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1930, 1990 आणि 2014 मध्ये तो उपविजेता ठरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cristiano Ronaldo Sparks Fresh FIFA World Cup 2026 Controversy
Spain wins FIFA World Cup final after 16 years
Argentina vs Spain FIFA World Cup Final fight viral video
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Marathi News Esakal
www.esakal.com