FIFA World Cup 2022: कतारमध्ये वर्ल्डकप कव्हर करायला गेलेल्या पत्रकारालाच लुटले! VIDEO होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fifa world cup 2022 Argentinian tv reporter dominique metzger robbed during live show at fifa world cup 2022 in Qatar

FIFA World Cup 2022: कतारमध्ये वर्ल्डकप कव्हर करायला गेलेल्या पत्रकारालाच लुटले! VIDEO होतोय व्हायरल

कतारमध्ये होत असलेल्या फुटबॉल विश्वचषक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यादरम्यान आता एका टिव्ही रिपोर्टचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक 2022 च्या उद्घाटन सामन्याच्या वृत्तांकनादरम्यान अर्जेंटिनाच्या पत्रकाराच्या बॅगेतून काही वस्तू चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पत्रकाराने याबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले तेव्हा कतार पोलिसांची प्रतिक्रिया देखील आश्चर्यकारक होती.

चोरी झाली तेव्हा ही महिला रिपोर्टर लाईव्ह होती आणि या लाइव्ह कव्हरेजचे फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले पत्रकार डॉमिनिक मेट्झगर यांनी यूके मिररला सांगितले की जेव्हा ती चोरीची तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गेली तेव्हा तिला विचारण्यात आले की चोराला कोणती शिक्षा भोगावी लागेल. आमच्याकडे हायटेक कॅमेरे असून आम्ही चोराला पकडू. तिला कोणती शिक्षा हवी आहे? चोराला पाच वर्षे शिक्षा करायची की देशाबाहेर काढायचे? असे पोलिसांनी रिपोर्टला विचारले.

कतारमध्ये वार्तांकन करताना अनेक पत्रकारांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. याआधी एका डॅनिश पत्रकाराला त्याच्या चॅनलसाठी चित्रीकरण करताना थांबवण्यात आलं होतं. स्पर्धेच्या आयोजकांनी नंतर रिपोर्टरची माफी मागितली आणि कबूल केले की रिपोर्टरला चुकून रोखण्यात आलं होतं.

हेही वाचा: T20 World Cup 2024 : ICC ने बदलला T20 वर्ल्डकपचा फॉरमॅट, आता 'अशी' होईल पात्रता फेरी

दरम्यान कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून FIFA विश्वचषक 2022 सुरू झाला आहे, ज्यामध्ये पहिला सामना यजमान कतारसोबत इक्वाडोरसोबत झाला होता. या सामन्यात कतारचा 2-0 असा पराभव झाला. यावेळी फिफा विश्वचषक 28 दिवस चालणार असून यामध्ये एकूण 64 सामने खेळवले जाणार असून 32 देश यात सहभागी होणार आहेत. या विश्वचषकाचा अंतिम सामना १३ डिसेंबरला होणार आहे.

हेही वाचा: Nikhil Khadse Death : निखिल खडसेंची आत्महत्या की हत्या? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

टॅग्स :2022 FIFA World Cup