FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाची युवती तिरंगा घेऊन पोहचली कतारमध्ये; VIDEO होतोय व्हायरल

FIFA World Cup 2022  Argentina Women Holding Tricolour
FIFA World Cup 2022 Argentina Women Holding Tricolouresakal

FIFA World Cup 2022 Argentina Women Holding Tricolour : कतारमध्ये होत असलेल्या फिफा वर्ल्डकप पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉल फॅन्सचा ओघ सुरू झाला आहे. यंदाचा वर्ल्डकप हा अर्जेंटिनाचा मेस्सी आणि पोर्तुगालचा रोनाल्डो शेवटचा वर्ल्डकप असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोघांचे फॅन्स आपल्या लाडक्या फुटबॉलरला शेवटचे वर्ल्डकपमध्ये खेळताना पाहण्यासाठी कतारकडे कूच करत आहेत. अर्जेंटिनाची अशीच एक युवती फिफा वर्ल्डकप पाहण्यासाठी कतारमध्ये दाखल झाली. मात्र तिच्या खांद्यावर अर्जेंटिनाचा नाही तर भारताचा तिरंगा होता. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

FIFA World Cup 2022  Argentina Women Holding Tricolour
FIFA World Cup 2022 : अखेर एम्बाप्पे धावला! डेन्मार्कने विश्वविजेत्यांना पहिल्या गोलसाठी 60 मिनिटे झुंजवले

दरम्यान, हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या यादील एम इक्बाल याने यामगची कहानी सांगितली. अक्बाल हा केरळचा रहिवासी आहे. त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तिरंगा घेतलेल्या या युवतीचे नाव लेटी इस्टेव्हेझ असे आहे. या व्हिडिओत यादील एम अक्बाल लेटीला भारतीय फुटबॉल चाहते अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीवर किती प्रेम करतात हे सांगताना दिसतो आहे. याच व्हिडिओत लेटीने भारतीयांचे मेस्सीबद्दल असलेले प्रेम पाहून तिरंगा आपल्या खांद्यावर घेतला. याचबरोबर भारतीयांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून तिरंगा आपण आपल्या देशात देखील नेणार असल्याचेही लेटी सांगते.

FIFA World Cup 2022  Argentina Women Holding Tricolour
FIFA World Cup 2022: सौदीच्या खेळाडूंना लॉटरी; प्रत्येकाला मिळणार रोल्स रॉयस

या व्हिडिओला 'देशाने वेगळे असलो तरी फुटबॉलने एकत्र आणले. लेटी इस्टेव्हेझ आमच्या देशावर प्रेम करण्यासाठी आभारी आहे.' असे कॅप्शनही देण्यात आले आहे. आज (दि 27) भारतीय वेळेनुसार रात्री 12.30 मिनिटांनी लिओनेल मेस्सी मैदानावर उतरणार आहे. अर्जेंटिना मॅक्सिकोशी भिडणार आहे. सौदी अरेबियाविरूद्धचा पहिला सामना गमवल्यामुळे अर्जेंटिनासाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com