Belgium comeback win against Senegal after extra time
esakal
Belgium qualify for Round of 16 after dramatic comeback: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील गुरुवारची पहाट थरारक सामन्यांचा अनुभव देणारी ठरली. इंग्लंडने २-१ असा विजय मिळवून आगेकूच केली खरी, परंतु डीआर काँगोने त्यांना कडवी टक्कर दिली. यजमान अमेरिकेने बोस्निया-हर्झेगोविनावर २-० असा विजय मिळवला, परंतु तिसरा आणखी रोमहर्षक राहिला. बेल्जियमनला सेनेगलने शेवटच्या मिनिटापर्यंत झुंजवले. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळातील तीन मिनिटे सामन्याला कलाटणी देणारी ठरली. त्यानंतर ही मॅच ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत गेली आणि त्यातही विजयी गोल झाला तो ५ मिनिटांच्या भरपाईवेळेत... सेनेगलने सर्वस्व पणाला लावूनही विजयाने त्यांना हुकलावणी दिली आणि तो क्षण फुटबॉल चाहत्यांना निराश करणारा ठरला.