FIFA WORLD CUP 2026: केप व्हर्दे अन् Vozinha यांनी पुन्हा करून दाखवले; स्पेननंतर उरुग्वेलाही रोखले, स्टेडियमवर 'आई'ला पाहून गोलरक्षक भावूक

Cape Verde hold Uruguay in FIFA World Cup 2026: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ मध्ये केप व्हर्देचा परीकथेसारखा प्रवास सुरूच आहे. स्पेनविरुद्ध ऐतिहासिक गुण मिळवल्यानंतर त्यांनी आता दोन वेळचे विश्वविजेते उरुग्वेलाही २-२ असे रोखून जगाचे लक्ष वेधून घेतले.
Cape Verde goalkeeper Vozinha celebrates with his mother Ana Cândida Évora

Cape Verde goalkeeper Vozinha celebrates with his mother Ana Cândida Évora

Updated on

Vozinha emotional moment with mother after Uruguay draw: केप व्हर्दे संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील स्वप्नवत वाटचाल कायम राखली आणि स्पेनला बरोबरीत रोखल्यानंतर केप व्हर्देने दोन वेळच्या विजेत्या उरुग्वेलाही २-२ अशा बरोबरीत रोखून चमत्कार घडवला. त्यांनी त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांत फक्त पाच फाऊल केले आणि १९६६ वंतर कोणत्याची संघाकडून पहिल्या फेरीत झालेले, हे सर्वात कमी फाऊल ठरले. पण, या सामन्यात पुन्हा एकदा चर्चेत राहिला तो गोलरक्षक व्होझिन्हा... व्हिसासाठी पैसे नसल्याने त्याच्या आईला स्पेनविरुद्धच्या सामन्यात उपस्थित राहता आले नव्हते, परंतु आज त्या उपस्थित होता आणि बरोबरीचा निकाल लागताच त्याने आईकडे पाहिले अन् त्याचे डोळे गहिवरले...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com