Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

पूर्वार्धात १-० असे पिछाडीवर राहिलेल्या माजी विश्वविजेत्या इंग्लंडच्या फुटबॉल संघाने काँगो डीआर संघावर २-१ असा विजय मिळवत अंतिम १६ फेरीत प्रवेश केला.
Harry Kane

Harry Kane

sakal

Updated on

अटलांटा - पूर्वार्धात १-० असे पिछाडीवर राहिलेल्या माजी विश्वविजेत्या इंग्लंडच्या फुटबॉल संघाने काँगो डीआर संघावर २-१ असा विजय मिळवत अंतिम १६ फेरीत प्रवेश केला.

कर्णधार हॅरी केन याने उत्तरार्धात केलेल्या दोन अप्रतिम गोलांच्या जोरावर इंग्लंडने फुटबॉल विश्वकरंडकात घोडदौड केली. ब्रायन सिपेंगा याने सातव्या मिनिटाला काँगो संघासाठी गोल केला. इंग्लंड-काँगो यांच्यामधील लढतीतील पूर्वार्धात काँगो या संघाने वर्चस्व गाजवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com