अर्जेंटिना-ब्राझील सामन्यात राडा; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कित्येक फॅन्स रक्तबंबाळ! मेस्सीने घेतला मोठा निर्णय...

अर्जेंटिना-ब्राझील सामन्यात राडा; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कित्येक फॅन्स रक्तबंबाळ! मेस्सीने घेतला मोठा निर्णय...

FIFA World Cup Qualifier : फीफा वर्ल्ड कप पात्रता फेरीत 21 नोव्हेंबरच्या रात्री ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात सामना खेळला गेला. हा सामना ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील माराकाना स्टेडियमवर खेळला गेला.

लिओनेल मेस्सीचा हा ब्राझीलमधील शेवटचा सामना होता. त्यामुळे कदाचित हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते आले होते. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली.

अर्जेंटिना-ब्राझील सामन्यात राडा; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कित्येक फॅन्स रक्तबंबाळ! मेस्सीने घेतला मोठा निर्णय...
Ind vs Aus : भारतीय संघात 3 सलामीवीर... कर्णधार सूर्या पहिल्या टी-20 मध्ये देणार कोणाला संधी?

राडा इतका वाढला की अर्जेंटिना फुटबॉल संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी खेळाडूंना घेऊन मैदानाबाहेर गेला. यामुळे सामना जवळपास 27 मिनिटे उशिराने सुरू झाला. चाहत्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

चाहत्यांवर लाठीचार्ज करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात एका चाहत्याचे डोके फुटले व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत आहे.

अर्जेंटिना-ब्राझील सामन्यात राडा; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कित्येक फॅन्स रक्तबंबाळ! मेस्सीने घेतला मोठा निर्णय...
IND vs ENG T20 Series : अभिमानास्पद! भारतीय महिला क्रिकेट संघात कोकणची 'प्रकाशिका' चमकणार; अष्टपैलू म्हणून निवड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाले, तेव्हा अर्जेंटिनाचे चाहते आणि तेथील स्थानिक प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाली. ब्राझीलच्या चाहत्यांनी लिओनेल मेस्सीची खिल्ली उडवली त्यामुळे हाणामारी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी काही लोकांनी ब्राझीलच्या पोलिसांवर हात उचला. चाहत्यांची भांडण सोडवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

त्यावेळी लिओनेल मेस्सीने ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, परिस्थिती शांत झाल्यावरच मैदानात येईल. यामुळेच अर्जेंटिनाचा संघ 22 मिनिटांनी मैदानात आला. यानंतर खेळ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे सराव केला.

अर्जेंटिना फिफा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत (दक्षिण अमेरिका खंड) पाच सामन्यांतून 12 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ब्राझील पाचव्या स्थानावर आहे. दहा संघांच्या राऊंड-रॉबिन पात्रता स्पर्धेत दोन्ही संघांनी त्यांचे मागील सामने गमावले होते. मात्र, या सामन्यात अर्जेंटिनाने ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com