

FIFA World Cup Referee
Esakal
FIFA World Cup Referee Death: फिफा वर्ल्ड कपच्या रेफरी टीममधून हटवलेले डच रेफरी रॉब डीपरिंग हे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. डीपरिंक यांना २०२६ वर्ल्ड कपमध्ये व्हिडीओ असिस्टंट रेफरी बनायचं होतं. पण स्पर्धेच्या आधी त्यांच्यावर अल्पवयीनाच्या लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले. यामुळे त्यांना संघातून हटवण्यात आलं. मात्र नंतर सबळ पुराव्या अभावी प्रकरण बंद झालं. पण आता त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येतेय.