FIH Hockey : कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भारत - जर्मनी हॉकी सामना स्थगित

FIH Hockey Pro League India Germany Mens Matches postponed
FIH Hockey Pro League India Germany Mens Matches postponed esakal

भुवनेश्वर : एफआयएच हॉकी प्रो लीग (FIH Hockey Pro League) स्पर्धेतील भारत (India) आणि जर्मनी (Germany) (पुरूष) यांच्यात होणारा कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली आहे. जर्मनीच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाला असून एका पाठोपाठ एक खेळाडू पॉझिटिव्ह (Corona Positive) येत आहेत.

FIH Hockey Pro League India Germany Mens Matches postponed
अंपायरच्या खुर्चीवर रॅकेट आपटणाऱ्या झ्वेरेव्हवर निलंबनाची कारवाई

भारत आणि जर्मनी यांच्यातील सामने 12 आणि 13 मार्चला भुवनेश्वरमध्ये होणार होता. मात्र हे सामने स्थगित करण्यात आले आहेत. दरम्यान 'एफआयएच हॉकी इंडिया (Hockey India) आणि हॉकी जर्मनी हे दोघेही यासंबंधी काम करत आहेत. स्थगित झालेले सामने कधी खेळवायचे याबाबत चर्चा सुरू आहे.'

पुरूषांचे सामने जरी रद्द झाले असले तरी भारत आणि जर्मनी यांच्यातील महिला हॉकी (Womens Hockey) संघाचे सामने हे ठरल्या वेळेनुसार होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com