
दक्षिण आफ्रिकेआधी भारताने मंगळवारी फ्रान्सला ५-० ने पराभूत केलं होतं.
चक दे इंडिया! भारताने १०-२ च्या फरकाने उडवला आफ्रिकेचा धुव्वा
नवी दिल्ली - भारताच्या हॉकी संघाने एफआयएच प्रो हॉकी लीगमध्ये (FIH Pro Hockey League) यजमान दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) १०-२ अशा गोल फरकाने धुव्वा उडवला. या सामन्यात युवा ड्रॅग फ्लिकर जुगराज सिंह याने तीन गोल नोंदवून हॅटट्रिक केली. विशेष म्हणजे त्याचा हा दुसराच आंतरराष्ट्रीय सामना आहे. जुगराजने चौथ्या, सहाव्या आणि २३ व्या मिनिटाला गोल नोंदवला. (India Won against South africa in fih pro hockey league)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताकडून (India) जुगराजशिवाय गुसाहिबजीत सिंह, दिलप्रीत सिंह, हरमनप्रीत सिंह, अभिषेक आणि मनदीप सिंह यांनी गोल केले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दोन गोल नोंदवता आले. डॅनियल बेल आणि रिचर्ड पॉट्झ यांनी दोन गोल केले. भारताने या सामन्यात वर्चस्व राखताना तब्बल १२ पेनल्टी कॉर्नर मिळवले.
हेही वाचा: पाहुण्यांनी टेकले गुडघे; रोहित ब्रिगेडनं वनडे मालिका जिंकली!
दक्षिण आफ्रिकेआधी भारताने मंगळवारी फ्रान्सला ५-० ने पराभूत केलं होतं. भारताने पहिल्या दोन क्वार्टरमध्ये पूर्णपणे वर्चस्व राखलं होतं. हाफ टाइममध्ये ८-० अशी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेनं आक्रमक खेळ करत २ गोल केले. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने सावध खेळ करत दक्षिण आफ्रिकेला गोल करण्यापासून रोखले. आता भारताचा पुढचा सामना शनिवारी पुन्हा फ्रान्ससोबत असणार आहे.
Web Title: Fih Hockey Pro League India Win Against Hosts South Africa With 10 2 Differencce
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..