Finn Allen: अ‍ॅलनने स्टार्कची उडवली झोप, पहिल्याच षटकात केला कहर, 262 च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Finn Allen T20 World Cup 2022

Finn Allen: अ‍ॅलनने स्टार्कची उडवली झोप, पहिल्याच षटकात केला कहर, 262 च्या स्ट्राईक रेटने कुटल्या धावा

Finn Allen T20 World Cup 2022 : सुपर-12 च्या मुख्य सामन्याला आजपासुन सुरुवात झाली आहे. यजमान ऑस्ट्रेलियासमोर शेजारी न्यूझीलंडचे आव्हान आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर-12 च्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु फिन अ‍ॅलनने कांगारूंच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. पॉवरप्लेमध्येच किवी संघाला 50 च्या पुढे नेले. अॅलनने सामन्याच्या पहिल्याच षटकात आपले इरादे स्पष्ट केले.

हेही वाचा: T20 World Cup AUS vs NZ Live : पॉवर प्लेमध्येच कांगारूंची टॉप ऑर्डर ढेपाळली

फिन अ‍ॅलन ही पहिली आयसीसी स्पर्धा खेळत आहे. पण वर्ल्डकपच्या पहिल्याच डावात त्याने असे वादळ निर्माण केले की पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने आपल्याच भूमीवर झोप उडवले. अ‍ॅलनची खेळी फार मोठी नव्हती. त्याने फक्त 16 चेंडूंचा सामना केला. पण हे 16 चेंडू ऑस्ट्रेलियाचे होश उडवून टाकणारे होते आणि न्यूझीलंडच्या खेळाचा सूर लावणारे होते. अ‍ॅलनने 16 चेंडूत 262.50 च्या स्ट्राईक रेटने 42 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 षटकार आणि 5 चौकार मारले. म्हणजेच अवघ्या 8 चेंडूत चौकारांद्वारे 38 धावा केल्या. फिन अ‍ॅलनच्या या झंझावाती खेळीचा परिणाम म्हणजे पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडने 1 गडी गमावून 65 धावा केल्या.

हेही वाचा: Robin Uthappa : उथप्पा काय म्हणतोय; भारत नाही तर पाकिस्तान सेमी फायनल खेळणार!

सलामीवीर डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 आणि फिन अ‍ॅलनच्या 16 चेंडूत 42 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या जेमी नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. निशमने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने हेजलवूडला शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 2 तर झाम्पाने 1 विकेट घेतली.

हेही वाचा: भेट राज ठाकरे शिंदे-फडणवीसांची पण चर्चा स्वेटरची, कोणाची आहे ही जर्सी ?

  • न्यूझीलंड संघ : डेव्हॉन कॉनवे, फिन अ‍ॅलन, केन विलियम्सन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅम्पमन, जिमी निशॅम, मिचेल सँटनर, टीम साऊदी, इश सोढी, ल्युकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

  • ऑस्ट्रेलिया संघ : अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झम्पा, जोश हेझलवूड