Flash_Back 2021 : कांगारू कानामागून आले अन् तिखट झाले!

यापेक्षा अनपेक्षित काही घडलं असेल तर ते म्हणजे कांगारुंनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत मिरवलेला तोरा.
ICC T 20 World Cup Teams Captain
ICC T 20 World Cup Teams CaptainICC Twitter

Cricket Flashback 2021 : क्रिकेट कोरोनाच्या संकटातून सावरत असताना यावर्षी क्रिकेटमध्ये आयसीसीचे दोन इव्हेंट (ICC Event) पार पडले. यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) आणि टी-20 वर्ल्ड (ICC T 20 World Cup) कपचा समावेश होता. न्यूझीलंडने पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कप उंचावला. भारतीय क्रिकेटच्या पदरी दोन्ही इव्हेंटमधून निराशा पदरी पडली. कसोटी आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील भारतीय संघालाच प्रबळ दावेदार मानले गेले. पण दोन्ही स्पर्धेत टीम इंडियाच्या (Team India) पदरी निराशा आली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपर्यंत मजल मारली. पण न्यूझीलंडने (New Zealand) टीम इंडियाला पराभवाचा दणका दिला. दुसरीकडे टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद असताना साखळी फेरीतच भारतीय संघ बाहेर पडला. यापेक्षा अनपेक्षित काही घडलं असेल तर ते म्हणजे कांगारुंनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत मिरवलेला तोरा.

ICC T 20 World Cup Teams Captain
Video : लढवय्या Jos Buttler च्या खेळीला Hit Wicket चं गालबोट

आयसीसीच्या टी 20 क्रमवारीतील (ICC T20Is Rankings) पहिल्या सहा संघांचा विचार केला तर यंदाच्या वर्षात पाकिस्तान संघाने आपला बोलबाला दाखवून दिलाय. वर्षभरात त्यांनी 29 टी20 सामन्यातील 20 सामने जिंकले. केवळ 6 सामन्यातील पराभव आणि तीन सामने अनिर्णित राहिल्याने त्यांचे वर्षातील विनिंग पर्सेंटेज हे 77 च्या घरात आहे. क्रमवारीतील पहिल्या पाचमध्ये पाकिस्तानच्या संघाची कामगिरी अव्वल राहिल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

ICC T 20 World Cup Teams Captain
WTC Point Table : ऑस्ट्रेलिया-श्रीलंका बरोबरीत; टीम इंडियाचं स्टेटस काय?

त्यांच्या पाठोपाठ भारतीय संघाचा नंबर लागतो. टीम इंडियाने (Indian Cricket Team) 2021 मध्ये क्रवारीतील पहिल्या सहा देशांमध्ये सर्वात कमी 16 टी-20 सामने खेळले. यात 10 विजय आणि 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाचे विनिंग पर्सेंटेज 62.5 च्या घरात आहे. ऑस्ट्रेलिया संघ रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर होता. यंदाच्या वर्षांत प्रत्येक स्पर्धेत ते अडखळताना दिसले.

वर्षभरात 22 टी20 सामन्यात त्यांनी 10 सामने जिंकले तर 12 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे विनिंग पर्सेंटेज भारत आणि पाकिस्तान संघापेक्षाही कमी 45.45 टक्के इतके आहे. टी-20 रँकिंगमध्ये नंबर वन असलेल्या इंग्लंडच्या संघानेही ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत अधिक सामने जिंकले आहेत. त्यांचे विनिंग पर्सेंटेज हे 64 च्या घरात आहे. इंग्लंडला 17 सामन्यात 11 टी20 सामन्यात विजय मिळाला. त्यांनी 6 सामन्यात पराभव स्विकारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com