Commonwealth Games 2026: एका माजी गोलंदाजाने नीरज चोप्राला भालाफेकीत हरवले; CWG मध्ये गोल्ड जिंकणारा तो कोण?

Neeraj Chopra silver medal Commonwealth Games 2026: माजी क्रिकेटपटू रुमेश थरंगा पाथिराजेने राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मध्ये 89.75 मीटर भालाफेक करत नीरज चोप्राला मागे टाकत सुवर्णपदक जिंकलं. जाणून घ्या त्याचा क्रिकेटपासून भालाफेकीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.
Commonwealth Games 2026

Commonwealth Games 2026

esakal

Updated on

Neeraj Chopra silver medal Commonwealth Games 2026: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने ८५.८३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक जिंकले.

तर भारताच्याच युवा भालाफेकपटू यशवीर सिंगने ८५.४१ मीटरची फेक करत कांस्यपदक पटकावले. मात्र या स्पर्धेत श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिराजेने ८९.७५ मीटरचा दमदार थ्रो करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com