हॅलिकॉप्टर शॉटसाठी सुशांतने केला नऊ महिने सराव;  प्रशिक्षक किरण मोरे यांची श्रद्धांजली...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

सुशांतने अशा प्रकारे जाणे धक्कादायक आहेच; पण त्याचबरोबर एका अविस्मरणीय प्रवासाला अकाली पूर्णविराम मिळाला, अशी श्रद्धांजली मोरे यांनी व्यक्त केली.

मुंबई : एम. एस. धोनी : दि अनटोल्ड स्टोरी... या चित्रपटात धोनीची भूमिका करणारा सुशांतसिंग राजपूत क्रिकेट क्षेत्रातही कमालीचा लोकप्रिय झाला होता. या चित्रपटासाठी माजी यष्टिरक्षक किरण मोरे हे सुशांतकडून "धोनी" घडवत होते. सुशांतच्या आत्महत्येमुळे किरण मोरेही व्यथित झाले. 

वाचा ः सुशांतच्या आत्महत्येच्या केवळ तीन तासांपूर्वी अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस...

सुशांतने अशा प्रकारे जाणे धक्कादायक आहेच; पण त्याचबरोबर एका अविस्मरणीय प्रवासाला अकाली पूर्णविराम मिळाला, अशी श्रद्धांजली मोरे यांनी व्यक्त केली. धोनीची भूमिका करण्यासाठी सुशांतने क्रिकेटपटू घेतो एवढी मेहनत घेतली होती. 

वाचा ः सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 'या' आहेत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया.

धोनीची खासियत असलेला हॅलिकॉप्टर शॉट खेळण्यासाठी त्याने नऊ महिने सराव केला होता. त्याचबरोबर यष्टिरक्षण ही एक स्वतंत्र कला आहे, सराव करताना अनेकदा त्याला चेंडू लागत होते; पण काही वेळातच तो पुन्हा तयार होत असे. बघता बघता तो एक चांगला क्रिकेटपटू तयार झाला होता, असे मोरे यांनी सांगितले. 

वाचा ः ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनमध्ये मानसिक स्थैर्य महत्त्वाचे 
सुशांत राजपूतच्या आत्महत्येमुळे मोरे यांनी महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना सर्वांना घरात रहावे लागत आहे. अशा वेळी मानसिक स्थैर्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशा परिस्थितीत सर्वांना मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कुटुंब किंवा मित्रांबरोबर सातत्याने चर्चा करत राहणे गरजेचे असते. प्रामुख्याने जे एकटेच राहतात, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे, असे मोरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former cricketer kiran more on sushant singh rajput incidence