
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आर. पी. सिंह यांचा मुलगा खेळतोय इंग्लंडकडून
भारताचे माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंह यांच्या मुलाची इंग्लंड अंडर-19 संघात निवड झाली आहे. हॅरी सिंग असे त्याचे नाव आहे. तो श्रीलंका अंडर-19 संघाविरुद्धच्या मालिकेत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. याआधी आरपी सिंह यांची मुलगी लँकेशायरच्या अंडर-19 संघाकडूनही खेळली आहे. मात्र, त्यानंतर तिने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.(Former India Pacer RP Singh Senior Son Harry Selected For England Under-19)
हॅरीच्या इंग्लंड संघातील निवडीने मी अत्यंत आनंदी आहे. लंडन येथे नुकत्याच झालेल्या डर्बीविरुद्धच्या एका सामन्यात १५० धावांची खेळी केल्यानंतर त्याला इंग्लंड अंडर १९ संघाकडून बोलावणे आले. या आधी देखील त्याने १३० धावांची खेळी केली होती. तो एक उत्कृष्ट फुटबॉलर देखील आहे. अशी प्रतिक्रिया आर. पी. सिंह मुलाच्या निवडीनंतर व्यक्त केली.
अठरा वर्षीय हॅरी हा सलामीवीर म्हणून आपल्या संघासाठी भूमिका पार पाडतो. “तो वेगवान गोलंदाजी करायचा, पण मला माहित आहे की वेगवान गोलंदाजी आणि सलामीची फलंदाजी खूप नुकसान करू शकते. म्हणून मी त्याला फलंदाजी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि आता तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करतो. हा अजून लांबचा प्रवास आहे, पण त्याने त्याच्या कारकिर्दीत एक छोटेसे पाऊल टाकले आहे.” अशी भावनादेखील आर. पी. सिंह व्यक्त केली.
आरपी सिंह हे मूळचे लखनौचे आहेत. त्यांनी 1986 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले होते. यानंतर, ते 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात इंग्लंडला गेले आणि तेथे लँकेशायर काउंटी क्लबला प्रशिक्षण देऊ लागले. त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डात प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.