
2020 या नव्या वर्षाची सुरवात तुम्ही या प्रेरणादायी व्हिडिओपासून करा.
Video : क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द बघून सचिन झाला भावूक!
भारताचा माजी महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक विक्रम आपल्या नावावर केलेल्या सचिनला 'क्रिकेटचा देव' संबोधले जाते. असे असताना कधीकधी तो रस्त्यावर उतरून लहान-मोठ्यांसोबत गल्ली क्रिकेट खेळतो. त्याचे व्हिडिओही व्हायरल होतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आता खुद्द सचिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. नव्या वर्षाची प्रेरणादायी सुरवात करण्याचा सल्ला देत त्याने हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान दिव्यांग मुलगा क्रिकेट खेळताना दिसत आहे. या व्हिडिओतील मुलाचं क्रिकेटवरील प्रेम आणि खेळण्याची जिद्द सचिनच्या मनाचा ठाव घेऊन गेली. आज 2020 नव्या वर्षाची सुरवात हा प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करत केली आहे.
- अनुष्कासोबतच्या सुट्या संपवून परतताच विराटला मिळाली गुड न्यूज
या फोटोला कॅप्शन देताना सचिनने म्हटले आहे की, ''2020 या नव्या वर्षाची सुरवात तुम्ही या प्रेरणादायी व्हिडिओपासून करा. या व्हिडिओत दिसत असलेला दिव्यांग मुलगा मद्दा राम त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असून त्याची जिद्द मला भावली. मला खात्री आहे की, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.''
- INDvsSL : भारतात खेळायचं म्हणून 18 महिन्यानंतर त्याला घेतलं संघात
मद्दा राम असं या मुलाचं नाव असून तो त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत आहे. दिव्यांग असल्याने त्याला नीट उभे राहता येत नाही, तर धावण्याची गोष्ट खूप लांबची. मात्र, तरीही तो आपल्या हातांच्या आधाराने धाव पूर्ण करतो.
- हार्दिकनं दिली प्रेमाची कबूली, बघा त्याची हॉट गर्लफ्रेंड
सचिनने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर उड्या घेतल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून चार तासांमध्ये पावणे दोन लाख नेटकऱ्यांनी तो पाहिला असून 48 हजारांहून अधिकांनी लाईक केला आहे.
Web Title: Former Indian Cricketer Sachin Tendulkar Shared Motivational Video Twitter
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..