esakal | काय..! तेव्हा सचिन नाॅट आऊट होता; एवढ्या वर्षांनंतर पंचांना उपरती
sakal

बोलून बातमी शोधा

तेव्हा सचिन तेंडुलकरला खोटे बाद ठरवले होते; एवढ्या वर्षांनंतर पंचांना उपरती

वेस्ट इंडीजचे माजी पंच स्टीव बकनर यांनी काही सामन्यांत सचिन तेंडुलकर बाद नसतानाही त्याला बाद ठरवल्याची कबुली दिली आहे. 

काय..! तेव्हा सचिन नाॅट आऊट होता; एवढ्या वर्षांनंतर पंचांना उपरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचे माजी पंच स्टीव बकनर यांनी भले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंचांमध्ये ठसा उमटवला असेल, परंतु त्यांचे अनेक निर्णय भारतीयांच्या विरोधातलेच होते. सचिन तेंडुलकर तो बाद नसतानाही त्याला बाद ठरवल्याची कबुली अखेर त्यांनी 17 वर्षांनंतर दिली. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियात गॅबा येथील मैदानावर झालेल्या सामन्याची आठवण बकनर यांनी काढली आहे. त्या सामन्यात जेसन गिलेस्पीचा चेंडू यष्टींच्या वरून जात होता तरी मी सचिनला पायचीत ठरवले होते. ही आपली चुक होती, असे बकनर आत्ता कबुल करतात.

पाहा सचिनने वडिलांना समर्पित केलेली ती खास इनिंग

सचिनच्याबाबतीत एका चुक केल्यानंतर बकनर यांनी दोन वर्षांनंतर पुन्हा सचिनलाच चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले होते. 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कोलकाता येथील सामन्यात अब्दुर रझाकच्या चेंडूवर सचिनला झेलचीत ठरवले होते. प्रत्यक्षात मात्र त्याच्या बॅटला चेंडू लागला नसल्याचे मला नंतर समजले, अशी आठवण बकनर आता सांगत आहेत. पाकिस्तानविरुद्ध सचिनला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याने आपली पुढील कारकिर्द धोक्यात आल्याचेही ते सांगतात. पंच सुद्धा माणूस असतो चुका होऊ शकतात. ईडन गार्डनमध्ये एक लाख प्रेक्षक असतात आणि त्यात भारताची सुरू असेल तर काहीच ऐकू येत नसते अशा वेळी बॅटच्या कडेला लागलेला चेंडू ऐकू येत नाही. आपल्याकडून सचिनबाबत दोनदा चुका झाल्या आणि त्या आपण मान्य करत आहोत, असे बकनर यांनी सांगितले. 

मी पुन्हा देशासाठी खेळण्यास उत्सुक : श्रीसंत

तंत्रज्ञानाचे महत्व
अचुक निर्णयासाठी तंत्रज्ञानाची घेण्यात येणारी मदत योग्यच आहे. रिव्ह्यू (डीआरएस) पद्धतीमुळेही खेळाडूंना फायदा होतो, परंतु सातत्याने रिव्ह्यू घेऊ नये मोजकेच रिव्ह्यू असावेत त्यामुळे पंचाचाही आत्मविश्वास कायम रहतो, असे बकनर म्हणतात.

ऑलिंपिक शिबिरेच सुरू राहणार - किरेन रिजिजू

loading image